Wednesday, May 13

Ardhapur police Seize : अर्धापुर पोलीसांनी 21 जनावरासह कंटेनर असा 35,71,900/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त

नांदेड | अर्धापुर पोलीसांनी 21 अवैध म्हैस, रेडा वर्गीय जातीचे जनावरासह कंटेनर असा एकूण 35 लक्ष 71,900/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून धडाकेबाज कार्यवाही केली आहे.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अवैध जनावरे वाहतुक करणारे व्यक्ती व वाहना विरुध्द कारवाई करण्याचे आदेश चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक अर्धापुर यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 11/07/2025 रोजी पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर कदम व त्यांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना हिंगोली ते नांदेड रोडवर एका कंटेनरमध्ये अवैध म्हैस, रेडा वर्गीय जातीचे जनावरे वाहतुक करीत आसल्याचे माहीती मिळाल्यावरुन पार्डी शिवारात टोलनाक्याजवळ थांबले होते.

हिंगोलीकडुन एक टाटा कंपणीचा कंटेनर क्रं. युपी-22/एटी-5187 येत असल्याचे दिसले असता त्यास थांबवुन दोन पंचासमक्ष पाहणी केली असता म्हैस, रेडा वर्गीय जातीचे 21 अवैध जनावरे किंमत 20,71,900/-रु आणि टाटा कंपणीचा कंटेनर क्रमांक यूपी-22/एटी-5187 किंमत 15,00,000/- रु असा एकूण 35,71,900/-रु चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुन पोलीस स्टेशन अर्थापुर येथे आणुन उपरोक्त नमुद आरोपी विरूध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायदया अन्वये गुन्हा दाखल करुन पुढील कायदेशीर कार्यवाही केली आहे. तसेच चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार पोस्टे अर्धापुर यांनी 35,71,900/- रु चा मुद्देमाल जप्त करुन उत्कृष्ट कामगीरी केली आहे. सदर कामगीरी करणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

IMG 20250711 WA0069 Ardhapur police Seize : अर्धापुर पोलीसांनी 21 जनावरासह कंटेनर असा 35,71,900/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त

हि कार्यवाही अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, श्री. डॅनियल वेन, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक, श्री परमेश्वर सूर्यवंशी, पोउपनि, पोस्टे अर्धापुर, चाग्रेपोउपनि वेद पाठक, पोहेकों प्रकाश बोदेमवाड, पोकों महेंद्र डांगे, विजय कदम, सलीम शहा, सर्व नेमणूक पोस्टे अर्धापुर आदींनी केली. आरोपी फरीद भरा, रा. जुटीया ता. सदर जि. रामपुर, मोहम्मद आक्रम पि इसार अहमद, रा. लालबाग मक्का अमरोहा, शमसाद रहमङ्गलाही, लेबर कॉलनी मुजफरनगर, फुरखान अख्तर, रा. मुजेडा ता. मुजेडा मुजफरनगर, रशिद पि. मुजुराव मसुरी, प्रेमनगर ता. बनत जि. शामली राज्य उत्तर प्रदेश यांच्याकडून 21 म्हस, रेडा वगीय जातीचे किंमत 20 लक्ष 71 हजार 900/-रुपये टाटा कंपणीचा कंटेनरे क्रमांक यूपी-22/एटी-5187 किंमत 15,00,000/- रु असा एकूण 35 लक्ष 71,900/-रुपयचा मुद्देमाल जप्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!