नांदेड, अनिल मादसवार| स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी बनावटीच्या पिस्तुलांचा वापर करून चेन स्नॅचिंग, घरफोडी, दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी केलेल्या १४ गुन्ह्यांची उकल करत, अटक करण्यात आलेल्या त्या सात आरोपींकडून ६,८९,६९७/- रुपयांच्या मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या (Inter-state gang involved in chain snatching, house burglary, two-wheeler theft using pistols busted in Telangana – Maharashtra) आहेत. पोलिसांच्या या दबंग कार्यवाहीने दरोड्यांमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांसह गुन्हेगारामध्ये दहशत निर्माण झाली आहे.


गेल्या काही वर्षांत नांदेड जिल्ह्यात गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. गुन्हेगारांची एक आंतरराज्यीय टोळी सक्रिय आहे, ती टोळी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या विविध भागात गुन्हे करून सामान्य जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करत आहे. नांदेडचे पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत त्या गुन्हेगारांना अटक करून गुन्हे उघड करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांना दिले होते.

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली होती. यादरम्यान नांदेडच्या आसनपुल येथे चोरांची एक टोळी लपून बसल्याची माहिती मिळाली. यादरम्यान पोलिस पथकाने छापा टाकला. येथे आणि इतर ठिकाणी सात गुन्हेगारांना अटक करून या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. या गुन्हेगारांनी तेलंगणा, महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून चेन स्नॅचिंग, घरफोडी आणि मोटारसायकल चोरी केली होती. त्यांच्याकडून चोरीला गेलेला ६,८९,६९७ रुपये (सहा लाख नव्व्याण्णव हजार सहाशे अठ्ठावन्न रुपये) किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चोरांना व लुटमारीच्या घटनांना आळा घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचेही त्यांनी कौतुक केले.



पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव
01. अमन ऊर्फ आमन्या किशोर जोगदंड वय 21 वर्ष, रा. खोब्रागडेनगर, नांदेड. (चैन स्नॅचिंग)
02. राहुल ऊर्फ हिपहाप मानिका लिंगायत वय 23 वर्ष, रा.जि.प. शाळेच्या मागे भोकर (चैन स्नॅचिंग)
03. मोहम्मद आफताब ऊर्फ अदु अब्दुल खदीर वय 21 वर्ष, रा. दिवानी बावडी, इतवारा ह. मु. मुदखेड (चैन स्नॅचिंग)
04. शेख मोबीन शेख गौस वय 25 वर्ष, रा. खुदबेनगर नांदेड (गावठी कट्टा)
05. संजय ऊर्फ संजु दत्ता गुंडेवार वय 30 वर्ष, रा. नंदीग्राम सोसायटी नांदेड (गावठी कट्टा)
06. रोहीत नरेंद्र ताटीपामुलवार वय 21 वर्ष, रा. भावेश्वर नगर चौफाळा, नांदेड. (गावठी कट्टा)
07. राहुल चंद्रकांत राव वय 25 वर्ष, रा. आंबेडकर नगर भोकर (रोख रक्कम)

पोलिसांनी आरोपींकडून ताब्यात घेतलेला मुद्येमाल
०१. सोन्याचे शॉर्ट गंठन 10 ग्रॅम कि.अं.60,000/- रू.
०२. सोन्याचे गंठन 14 ग्रॅम कि.अं. 98,187/-रू
०३. सोन्याचे गंठन 15 ग्रॅम कि. अं. 60,000/-
०४. सोन्याचे शॉर्ट गंठन (तुटलेले) 11 ग्रॅमचे कि.अं. 41,910/-
०५. सोन्याचे शॉर्ट गंठन 18 ग्रॅम कि. अं.51300/- रू.
०६. सोन्याच्या बाळया 01 ग्रॅम कि. अं 5000/-रु.
०७. नगदी 15500/-रु
०८. KTM कंपणीची मो.सा. क्र. MH 26 AX 555 कि.अं. 150000/-
०९. स्पेल्डंर प्रो. मो.सा. क्र. MH26 AE 5660 कि.अं 30000/-
१०. चार लोखंडी गावठी मॅगझीनसह पिस्टल, एक मॅगझीन व 07 काडतुस कि.अं. 1,07,800/-
११. 14 ग्रॅम सोन्याचे गंठण किं. अं. 70000/- असा एकुण 6,89,697 रू (सहा लाख एकोणनव्वद हजार सहाशे सत्यान्नव रूपये)
हि कार्यवाही पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली साईनाथ पुयड पोलीस उप निरीक्षक स्था.गु.शा. नांदेड, महेश कोरे पोलीस उपनिरीक्षक, माराती चव्हाण पोलीस उपनिरीक्षक (सायबर शाखा) स्था.गु.शा. नांदेड पोहेकॉ/मोहन हाके, पोहेकॉ दारासिंघ राठोड, पोहेकॉ मिलींद नरबाग, पोकों/बालाजी कदम, पोकॉ/राजु डोंगरे, पोकों/महेश बडगु, पोकों/इम्रान शेख, पोकॉ/प्रमोद जोंधळे, पोकॉ संदीप घोगरे, पोकों/रितेश कुलथे, पोकों श्रीराम दासरे, पोकों/माने, पोकों/उमर शेख, चालक पोकों/अमोल घेवारे, सायबर सेल नांदेड येथील पोहेकॉ राजु सिटीकर, दिपक ओढणे यांनी केली आहे.

