Nanded Crime News : तेलंगणा – महाराष्ट्रात पिस्तुलांचा वापर करून चेन स्नॅचिंग, घरफोडी, दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
नांदेड, अनिल मादसवार| स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी बनावटीच्या पिस्तुलांचा वापर करून चेन स्नॅचिंग, घरफोडी, दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी केलेल्या १४ गुन्ह्यांची उकल करत, अटक करण्यात आलेल्या त्या सात आरोपींकडून ६,८९,६९७/- रुपयांच्या मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या (Inter-state gang involved in chain snatching, house burglary, two-wheeler theft using pistols busted in Telangana - Maharashtra) आहेत. पोलिसांच्या या दबंग कार्यवाहीने दरोड्यांमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांसह गुन्हेगारामध्ये दहशत निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षांत नांदेड जिल्ह्यात गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. गुन्हेगारांची एक आंतरराज्यीय टोळी सक्रिय आहे, ती टोळी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या विविध भागात गुन्हे करून सामान्य जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करत आहे. नांदेडचे पोलिस अधी...
