Homeनांदेडउन्हाळी सुट्यात सुरु झालेली नांदेड-हडपसर-नांदेड विशेष गाडी रद्द - NNL

उन्हाळी सुट्यात सुरु झालेली नांदेड-हडपसर-नांदेड विशेष गाडी रद्द – NNL

नांदेड| नांदेड-हडपसर-नांदेड विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे अशी माहिती नांदेड डिव्हिजन रेल्वे विभागाच्या जनसंपर्क विभागाने जारी केली आहे.

उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड- हडपसर-नांदेड विशेष गाडीच्या 12 फेऱ्या मंजूर केल्या होत्या. या गाडीस प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभल्यामुळे या गाडीच्या उरलेल्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

1. नांदेड-हडपसर साप्ताहिक विशेष गाडी च्या 03 फेऱ्या रद्द : गाडी क्रमांक 07623 हुजूर साहिब नांदेड ते हडपसर विशेष गाडी दिनांक 12, 19 आणि 26 जून, 2024 ला दर बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री 21.00 वाजता सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

2. हडपसर – नांदेड साप्ताहिक विशेष गाडीच्या 03 फेऱ्या रद्द : गाडी क्रमांक 07624 हुजूर साहिब नांदेड ते हडपसर विशेष गाडी दिनांक 13,20, आणि 27 जून, 2024 ला दर गुरुवारी हडपसर रेल्वे स्थानकावरून दुपारी 15.15 वाजता सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

12 जूनची हुजूर साहिब नांदेड – अमृतसर सचखंड एक्सप्रेस सद्हेतुन तास उशिरा सुटेल
दिनांक 12 जून 2024 रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 12715 हुजूर साहिब नांदेड – अमृतसर सचखंड एक्सप्रेस तीची नियमीत वेळ सकाळी 09:30 वाजता सुटण्या ऐवजी दुपारी 13:00 वाजता सुटेल.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments