Jahagirdar : आवाज मराठीचा जल्लोष मराठीचा या ऐतिहासिक सभेसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे – जहागीरदार

नांदेड| हिंदी भाषा सक्तीचे निर्णय रद्द करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असता मराठी वरचा अन्याय होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि होणाऱ्या अन्याय सहन करणार नाही. अशी तडखर भूमिका राज साहेब ठाकरे यांनी घेतली असून, दिनांक 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटी वरून भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

मोर्चाची दखल घेत सरकारने हिंदी सक्तीचे निर्णय रद्द केल्याने मागणीला यश येऊन हिंदी सक्तीचे दोन्ही निर्णय रद्द केल्याचे जाहीर केले. मोर्चा रद्द झाल्याने जल्लोष मराठीचा या ऐतिहासिक सभा आयोजित केली आहे. या सभेकरिता नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तसेच अंगीकृत संघटना महिला सेनेच्या पदाधिकारी व मनसे सैनिक यांनी दिनांक 5 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता एन एम सी आय डोम वरळी मुंबई येथे होणाऱ्या सभेसाठी जाणार आहेत.

मुंबई येथे होणाऱ्या जल्लोष मराठीचा ऐतिहासिक सभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राज साहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जाण्यासाठी आणि आनंद साजरा करण्यासाठी जल्लोष मराठीचा या ऐतिहासिक सभेसाठी नांदेड जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी व मनसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान मनसे जिल्हा अध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार व तसेच मनसे शहर अध्यक्ष अब्दुल शफिक यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button