HomeनांदेडMla Antapurkar ; आ.अंतापूरकरांची तंबी,प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे आदेश ; देगलूर उपजिल्हा रुग्णालयात...

Mla Antapurkar ; आ.अंतापूरकरांची तंबी,प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे आदेश ; देगलूर उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी त्वरीत रुजू होणार

देगलूर, गंगाधर मठवाले। जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत आमदार जितेश अंतापूरकर साहेबांनी घेतलेल्या तंबीची दखल प्रशासनाने घेतली असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रतिनियुक्तीच्या विषयाला आता मूर्त स्वरूप मिळाले आहे.

देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्यामुळे, स्थानिक आरोग्य सेवा कर्मचारीअभावी विस्कळीत होण्याची शक्यता होती. ही बाब गंभीर असल्याने, सदर प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी सूचना श्री. अंतापूरकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना केली होती.

या सूचनेनुसार, प्रशासनाने त्वरित कारवाई करत प्रतिनियुक्ती रद्द केली असून संबंधित कर्मचाऱ्यांना मूळ पदस्थापनेच्या देगलूर उपजिल्हा रुग्णालयात त्वरीत रुजू होण्याचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे देगलूर परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार असून, सेवांची गुणवत्ता सुधारण्यासही मदत होणार आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments