नवीन नांदेड l छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेला नवीन नांदेड सिडको येथील रुबी हॉटेलमध्ये अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स चा छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार सोहळा 26 जुनं रोजी मोठ्या थाटा मध्ये संपन्न झाला,या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व नागरीकांच्यी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


आंबेडकरी चळवळीतील योगदानाबद्दल अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही निवडक आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,यामध्ये चंद्रा भाऊ ठाकरे,प्राचार्य अरुण कांबळे, जयप्रकाश वाघमारे,ॲड.हरि दर्शनवाड, नंदाताई लोखंडे,वेणूताई जोगदंड, मनीषा शिंदे,चेतना जाधव,राधिका चिंचोलीकर, बजरंग ताटे,राजेश घोडे,बाबुराव गालफाडे, लक्ष्मण वाघमारे,बालाजी शिंदे, डी,के,कांबळे, एस,एम,जोगदंड प्रा,ब,ना,गोईनवाड, प्रभाकर बोरकर, माधव शिरसाठ,सुरज झीने यांच्यासह एकूण 50 जणांना शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स चे संस्थापक बा,रा,वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन बालाजी नवघरे शिरसीकर यांच्या हस्ते तर पॅंथर नेते रमेश भाई खंडागळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी चंद्राभाऊ ठाकरे,प्राचार्य अरुण कांबळे, अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सचे प्रदेशाध्यक्ष डी, एस,वाघमारे बार्टीच्या प्रकल्प अधिकारी सुजाता ताई पोहरे आणि समाजसेविका शेख शकीला यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ,बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले आणि अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.यावेळी नांदेड, परभणी, हिंगोली, जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
