Vipassana center and abhyasika : आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नातून हादगाव येथील भदंत टेकडीवर विपश्यना केंद्र व अभ्यासिका होणार

हदगांव, गौतम कदम| येथील बौद्ध समाजाचे एकमेव श्रद्धास्थान असलेले भंदंत टेकडी वर बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नातून लवकरच एक विपश्यना केंद्र व अभ्यासिका मंजूर होणार असल्याचा प्रस्ताव आमदार कोहळीकर यांनी महाराष्ट्र शासनाकडे सादर केला होता. त्यांची दखल घेऊन प्रवीण शिशुपाल कार्यसन, अधिकारी महाराष्ट्र शासन, यांनी पुढील कारवाईस्तव समाज कल्याण विभागास पाठविलेला आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आ. बाबुराव कदम कवळीकर यांनी दिनांक 23 4 2025 रोजी महाराष्ट्र शासनाकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,सामाजिक विकास योजनेअंतर्गत विपश्यना केंद्र व अभ्यासिका केंद्र भदंत टेकडी हादगाव येथे करण्यात यावी. त्यासाठी अत्यंत रमणीय स्थळे गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी अभ्यास करण्यासाठी व कोणत्याही ताण-तनातून मुक्त होण्यासाठी ध्यान भावना केंद्र असावे. या उद्देशाने त्यांनी विपश्यना केंद्र व अभ्यासिकेची मागणी केली.

त्यांच्या मागणीची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन दिनांक 19 जून 2025 पत्र क्रमांक 2025/प्रक्र 105 / अजाक /आयुक्त समाज कल्याण पुणे यांना देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत विपश्यना केंद्र व अभ्यासिका मंजूर करणेबाबत कळविले आहे. या प्रस्तावास लवकरच मान्यता मिळेल अशी अपेक्षा दिसून येत असून, त्याबाबत तालुक्यातील बौद्ध समाज बांधवांकडून आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचे अभिनंदन होत आहे.


मागील दहा वर्षे काँग्रेस पक्षाचे आमदार माधवराव पाटील जळगावकर असताना त्यांनी बौद्ध समाजाची व गोरगरीब जनतेचे मोठ्या प्रमाणात मते देऊन निवडून आणले पण त्यांना दहा वर्षात काही समाज बांधवांसाठी केले नाही. ते अवघ्या काही दिवसातच आ.बाबुराव कदम कोहळीकर साहेबांनी केले. अशी बोलकी प्रतिक्रिया बौद्ध अनुयायाकडून ऐकायला मिळत आहे.




