Friday, June 26

Yoga Day ; समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात योगदिन उत्साहात साजरा

उस्माननगर, माणिक भिसे l अकराव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने आदरणीय शामराव जहागीरदार गुरूजी व आदरणीय वारकड गुरूजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व हाडको नविन नांदेड येथील योग शिक्षीका सौ.संगीता बीडवई,सौ.कल्पणा गव्हाणे,प्रियंका कडकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देण्यात आले यावेळी सौ.बीडवई यांनी योग व योगाचे महत्त्व विषद केले.

सहज योगा चे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले समता विद्यालया च्या विद्यार्थ्यां करवी करूण घेण्यात आले.या वेळी सर्व शिक्षक – शिक्षिका कर्मचारी यांनी योगासनाचे धडे घेतले.प्रसंगानुरूप सौ.बीडवई यांनी सहज योगा,मेडिटेशन कपालभाती, अनुलोम विलोम,पवनमुक्तासन ई. असनाचे प्रकार आणि त्यांचे महत्व पटवून दिले.

IMG 20250621 WA0010 Yoga Day ; समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात योगदिन उत्साहात साजरा

योग शिक्षीकां यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यक्रमा नंतर विद्यालया तील योग शिक्षीका सौ.गौतमी कुलकर्णी, योग शिक्षक राठोड ,बसवेश्वर डांगे यांनी विद्यार्थ्यां करावी योग प्रात्यक्षिक करुन घेतले.मुख्याध्यापक- गणेश सोणवने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घडुन आला. कार्यक्रमा चे प्रासताविक व सुत्रसंचलन पर्यवेक्षक – राजीव अंबेकर यांनी केले तर आभार योग शिक्षीका सौ.गौतमी कुलकर्णी यांनी मानले .हा भव्य दिव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक -शिक्षीका सर्व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!