HomeनांदेडInternational yoga day ; आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दीड लाख वृक्षबीजांची जैविक पद्धतीने...

International yoga day ; आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दीड लाख वृक्षबीजांची जैविक पद्धतीने लागवड

नवीन नांदेड़ l श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आरोग्य व पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने दोन महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. यात संस्थेच्या प्रांगणात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले, आ. प्रताप पाटिल चिखलिकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कंधार तालुक्यातील चिखली गावात सुमारे दीड लाख वृक्षबीजांची जैविक पद्धतीने लागवड करण्यात आली.

सकाळी ७ वाजता संस्थेच्या बास्केटबॉल कोर्टवर आयोजित योग शिबिरात विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व कर्मचारीवर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.योगतज्ज्ञ डॉ. लेनिना एस. व्ही. बी. व डॉ. अंकुश सावरकर यांनी विविध योगासने व प्राणायामाच्या तंत्रांचे सविस्तर मार्गदर्शन केले.

योगसत्रानंतर संस्थेच्या वतीने चिखली (ता. कंधार) येथे वृक्षबीज व वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. रस्त्याच्या दुतर्फा सुमारे ५ किलोमीटर क्षेत्रात १,५०,००० वृक्षबीजांची जैविक पद्धतीने पेरणी करण्यात आली. या उपक्रमाला लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर, संस्थेचे संचालक डॉ.मनेश कोकरे, अधिष्ठाता प्रा.संजय देठे, प्रबंधक डॉ. अरुण पाटील, डॉ.अंकुश सावरकर यांची उपस्थिती लाभली.
आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्वतः वृक्षबीज पेरणी करत ग्रामस्थांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले. “वृक्षलागवड ही भविष्यासाठी दिलेली हरित भेट आहे.

प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले, “संस्थेने नेहमीच समाजहिताचे कार्य केले आहे. आजवर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करताना आम्ही सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव ठेवून आम्ही नियमितपणे असे उपक्रम राबवतो.आजचा योग दिन आमच्यासाठी पर्यावरणप्रेम दिवस ठरला आहे.

कार्यक्रमास संदीप बीजमावर, . भास्कर कदम, संस्थेचे कर्मचारी आणि चिखली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे कर्मचारी, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments