Homeनांदेडखुरगावला महिलांच्या श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास सुरुवात; २८ बौद्ध उपासक, उपासिकांना श्रामणेर दीक्षा

खुरगावला महिलांच्या श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास सुरुवात; २८ बौद्ध उपासक, उपासिकांना श्रामणेर दीक्षा

नांदेड| येथील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात दसदिवशीय महिलांच्या श्रामणेर प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ झाला असून अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो, श्रीलंकेच्या भिक्खूनी आर्याजी उपलवन्ना तसेच आर्याजी प्रजापती यांनी एकूण २८ बौद्ध उपासक, उपासिकांना श्रामणेर दीक्षा दिली. यात दहा महिलांचा समावेश आहे.

सदरील शिबिर १९ जूनपर्यंत चालणार असल्याची माहिती भदंत पंयाबोधी थेरो यांनी दिली. यावेळी भिक्खू संघासह उपप्राचार्य साहेबराव इंगोले, इंजि. भरतकुमार कानिंदे, विपश्यनाचार्य गौतम भावे, रत्नमाला भावे, माया पाईकराव, प्रा. यशवंत पाईकराव, डॉ. प्रतिक्षा कोल्हे, दिनेश कोल्हे, सिद्धांत इंगोले, अपेक्षा इंगोले, प्रज्ञाधर ढवळे, आप्पाराव नरवाडे, नागोराव नरवाडे आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात श्रामणेर प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येते. तसेच या प्रशिक्षण केंद्रात वर्षभर केव्हाही दीक्षा दिली जाते.

श्रीलंकेच्या भिक्खूनी आर्याजी उपलवन्ना आणि आर्याजी प्रजापती यांच्या पुढाकाराने उपासिका ज्योती रोकडे, सावित्री आडकुते, सुरेखा इंगोले, इंदुबाई ढोले, कुसुम धुतराज, मयुरी धुतराज, सह्याद्री गच्चे, अंतरा राऊत, शिला पडघणे, हर्षदा पाईकराव यांना श्रामणेर दीक्षा दिली. तसेच प्रताप वाघमारे, अशोक शेळके, भीमराव इंगोले, हर्षद धुतराज, असंग गच्चे, रतन निवडंगे, रमेश सोनवणे, अविनाश धुतराज, आदर्श गच्चे, रामदास भिसे, विशाल गायकवाड, दर्शन मांजरमकर, प्रेमल गव्हाणे, भीमसेन वाघमारे, महेंद्र मगरे, आदर्श कांबळे, अभिराज हटकर, वैभव थोरात या बालकांनाही भदंत पंयाबोधी थेरो यांनी दीक्षा दिली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments