उमरखेड,अरविंद ओझलवार। बाजार समिति संचालक मंडळ यांची ३ डिसेंबर २०११ या वर्षी निवडणुक झाली होती या संचालक मंडळाचा कारभार ३ डिसेंबर २०१३ रोजी संपुष्टात आला होता मात्र सभापती बाळासाहेब चंद्रे पाटिल व संचालक मंडळाने शासनाकडे मुदत वाढ मागितली असतांना यावर शासनाने विचार करुन या मंडळाला पुन्हा २ जुन पर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.
यावर न थांबता संचालकांनी पुन्हा शासनाकडे मुदतवाढ मिळावी म्हणून मनधरनी केली होती. शिवाय नागपुर खंडपिठा मध्ये धाव घेतली होती लोकसभेची आंचार संहिता ५ जुन पर्यंत असल्याने ६ जुन रोजी प्रशासक नियुक्तीचे आदेश जिल्हा निंबधक नानासाहेब चव्हाण यांनी काढल्या नंतर आज ६ जून गुरुवारी तालुका निबंधक विलास हिरुडकर यांनी समिति मध्ये प्रशासकीय पदभार स्विकारला आहे.
उमरखेड बाजार समिती संचालक मंडळाने आर्थिक देवाण-घेवाण करून बेकायदेशिर पणे नौकर भरती केली आहे , मुदतवाढी दरम्याण केलेली नोकर भरती बेकायदेशीर असून कागदोपत्री दाखवण्याकरिता परीक्षा घेण्यात आली आहे आहे त्यामुळे सदर नोकर भरती रद्द करण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. या बाबतीत पुरावे आहेत. अशी माहिती नामदेव ससाने, आमदार , उमरखेड यांनी दिली.
बाजार समिति प्रशासक पदाची सुत्र विलास हिरुडकर यांनी स्विकारताच कार्यालयीन कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन कामाचा आढावा घेऊन पुढील कामा संदर्भात मार्गदर्शन केले यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी प्रशासक हिरुडकर यांचे स्वागत केले त्यावेळी सचिव संदिप जाधव , सुधीर शिन्दे , अशोक कनवाळे , आनंद जगताप , सुनिल टिळेवाड , प्रविनजंन राठोड , प्रविण देवसरकर , देविदास जंगले , हरिचंद्र राठोड , गजानन कदम या सह विनायक कदम , रंगराव कदम , दतात्रय कदम हे सर्व उपस्थित होते.