सहा महिन्याच्या मुदतवाढीनंतर उमरखेड बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त ; प्रशासक हिरुडकर यांनी स्विकारला पदभार ! -NNL
उमरखेड,अरविंद ओझलवार। बाजार समिति संचालक मंडळ यांची ३ डिसेंबर २०११ या वर्षी निवडणुक झाली होती या संचालक मंडळाचा कारभार ३ डिसेंबर २०१३ रोजी संपुष्टात आला होता मात्र सभापती बाळासाहेब चंद्रे पाटिल व संचालक मंडळाने शासनाकडे मुदत वाढ मागितली असतांना यावर शासनाने विचार करुन या मंडळाला पुन्हा २ जुन पर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.
यावर न थांबता संचालकांनी पुन्हा शासनाकडे मुदतवाढ मिळावी म्हणून मनधरनी केली होती. शिवाय नागपुर खंडपिठा मध्ये धाव घेतली होती लोकसभेची आंचार संहिता ५ जुन पर्यंत असल्याने ६ जुन रोजी प्रशासक नियुक्तीचे आदेश जिल्हा निंबधक नानासाहेब चव्हाण यांनी काढल्या नंतर आज ६ जून गुरुवारी तालुका निबंधक विलास हिरुडकर यांनी समिति मध्ये प्रशासकीय पदभार स्विकारला आहे.
उमरखेड बाजार समिती संचालक मंडळाने आर्थिक देवाण-घेवाण करून बेकायदेशिर पणे नौकर भरती केली आहे , मुदतवाढी दरम्...
