HomeनांदेडHadgaon News ; हदगाव तहसिल कार्यालय परिसरात न. पा. नालीतील सांडपाण्याने निर्माण...

Hadgaon News ; हदगाव तहसिल कार्यालय परिसरात न. पा. नालीतील सांडपाण्याने निर्माण झाल गार्डन..! तहसिल प्रशासन गप्प..

हदगांव, शेख चांदपाशा। हदगाव शहरातील पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या आवारात शहरातील नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभाराने घाण पाण्याने एक मोठं घाणेरड उद्यान निर्माण झाले आहे.
यामुळे पंचायत समिती व तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना याचा फार त्रास होत आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. नगर परिषद हदगांव केडरचे मुख्यअधिकारी या गंभीर प्रश्नाकडे का दुर्लक्ष करित आहे असा प्रश्न नागरीकांना पडलेला आहे.
विशेष महणजे तहसिल कार्यालयाच्या जो प्रभाग आहे. त्या प्रभागातील सांडपान्याचं कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता थेट तहसील कार्यालयाच्या आवारात सोडण्यात आलेला आहे. आज परिस्थिती अशी आहे की, ग्रामीण व शहरी भागातील नागरिक आपल्या कामासाठी आले असता या घाण पाण्याचा फार त्रास होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
 नपा. प्रशासन प्रशासनाने प्रभागातील नाल्याचे सांडपाणी पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या आवारात सोडण्यात आले. याबाबत गटविकास अधिकारी व हादगाव तालुक्यातील तहसीलदार तथा दंडाधिकारी अद्यापही न. पा. प्रशासनाला साधा पत्र व्यवहारही केला नाही. हे आवर्जून उल्लेख करावा लागेल यावरून तालुक्याच प्रशासन नागरिकांच्या प्रश्न बाबत प्रशासन किती जागृत आहे हे दिसून येते.
NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments