HomeनांदेडBalyogi Vyankatswami Maharaj ; पिंपळगाव श्रीदत्त संस्थानचे मठाधिपती प.पु. बालयोगी व्यंकटस्वामी महाराज...

Balyogi Vyankatswami Maharaj ; पिंपळगाव श्रीदत्त संस्थानचे मठाधिपती प.पु. बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांना उज्जैन महापीठाची महोन्नती पदवी बहाल

हिमायतनगर/ नांदेड, अनिल मादसवार। नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र पिंपळगाव येथील श्री शिवसद्‌गुरु शिवलिंग स्वामी दत्तसंस्थान मठाचे मठाधिपती प.पु. गोवत्स बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांना सद्धर्म शिरोमणी ही उज्जैन पिठाची महोन्नती पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. श्री. ष. ब्र.१०८ शिवाचार्य पद घोषित करण्यात आले असून, लवकरच उज्जैनचे जगद्‌गुरु यांच्या सानिध्यात अनेक शिवाचार्याच्या उपस्थितीत पदाभिषेक सोहळा संपन्न होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा सर्कलमध्ये असलेले श्री दत्त संस्थान पिंपळगाव येथे दिनांक ६ ते १३ मार्च या कालावधीत प.पु. गोवत्स बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या पुढाकाराने भव्य शिवपुराण कथा प्रवक्ते श्री रेवासा वृंदावन ऊत्तरप्रदेशातील स्वामी श्री राजेंद्रदास देवाचार्यजी महाराज यांच्या मधुर वाणीत संपन्न झालेल्या शिवपुराण कथेला अथांग जनसागर लोटला होता. तसेच श्री १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ व नाम संकिर्तन सोहळ्यास लाखो भाविकांनी उपस्थित होऊन प्रचंड प्रतिसाद दिला या भूतो न भविष्यती धार्मिक सत्संग सोहळ्याची चर्चा आजही कुठे न कुठं होते आहे.

FB IMG 1746715420428 Balyogi Vyankatswami Maharaj ; पिंपळगाव श्रीदत्त संस्थानचे मठाधिपती प.पु. बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांना उज्जैन महापीठाची महोन्नती पदवी बहाल

दरम्यान शिवमहापुराण कथेच्या शेवटच्या टप्प्यात बागेश्वर धामचे महंत धिरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या आगमनाने उदंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. प.पु. गोवत्स बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी आपल्या आयुष्यात गोशाळेसह समाज घडविण्यासाठी केलेल्या परीश्रम आणि धर्म कार्याची पावती म्हणून नुकतीच श्रीमद् उज्जैन सद्धर्म सिंहासनाधिश्वर श्री श्री श्री 1008 जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य भागवतपाद महास्वामीजी, श्री उज्जैन महापीठ यांच्याकडून तिर्थक्षेत्र पिंपळगाव येथील मठाधिपती प पु गोवत्स श्री बालयोगी व्यंकटस्वामी महाराज पिंपळगाव यांना सद्धर्म शिरोमणी ही उज्जैन पिठाची महोन्नती पदवी देवून गौरविण्यात आले, एव्हढेच नाहीतर श्री ष ब्र 108 शिवाचार्य पद घोषित करण्यात आले असल्याचे भाविकभक्त सांगत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments