HomeनांदेडDr. Babasaheb Ambedkar ; पोखरभोसी येथे आ . चिखलीकर यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब...

Dr. Babasaheb Ambedkar ; पोखरभोसी येथे आ . चिखलीकर यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात

उस्माननगर, माणिक भिसे l लोहा तालुक्यातील पोखरभोसी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार ,क्रांतीसुर्य , भारतरत्न , महामानव , परमपूज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती दि.२९ एप्रिल रोजी सर्व जाती धर्मातील नागरीकांनी जयंतीमध्ये भाग घेवून मोठ्या थाटामाटात जयंती साजरी करण्यात आली.

भिमजयंतीच्या सकाळच्या सत्रात कार्यक्रमाच्या सुरूवातीला महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध ,छत्रपती शिवाजीमहाराज , महात्मा फूले, छत्रपती शाहूमहराज ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे, यांच्या प्रतिमेचे लोहा-कंधार विधान सभेचे मा.आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,साहेबराव काळे ( संचालक ,कृ.उ.बा.स लोहा ), नरेंद्र गायकवाड ( पंचायत समितीत उपसभपती लोहा ), आनंदराव पाटील शिंदे ढाकणीकर ( लोहा पंचायत समिती सभापती ).

मनोहरराव भोसीकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा ),शंकर पाटील घोरबांड ,डि.के.कांबळे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.मिराबाई कैलास गिरी ( सरपंच ),फुलाजी नारायण पाटील ताटे ( उपसरपंच ),दयानंद कांबळे ,( पोलीस पाटील ),छत्रगुण पाटील डांगे ( तंटामुक्त अध्यक्ष ),बळीराम पाटील ताटे ( चेअरमन ),श्रीनिवास पाटील ताटे ,आर.आर.गिते ,हरी मुळे ( मुख्याध्यापक ) , लोहा तालुका अभिभोक्ताचे अध्यक्ष वकिल सतिष ताटे , बि.एम.कांबळे ( राष्ट्रीय प्रबोधकार फुले शाहू,आंबेडकर मुंबई),प्रकाश ताटे ( शिक्षक ),नारायण ताटे ,तुकाराम पाटील ताटे , बालाजी पाटील ताटे ,व्यंकटराव पाटील डांगे ,गोविंदराव पाटील ताटे , कोंडीबा सुर्यवंशी ,व्यंकटराव ऊर्फ भबरू पाटील ताटे , सरपंच प्रतिनिधी कैलास गिरी महाराज , सुधाकर डांगे , जयंतीमंडळाचे अध्यक्ष अविनाश सोनकांबळे ,उपाध्यक्ष आशिष कांबळे ,सचिव ग्यानोबा वाघमारे ,सहसचिव रत्नाकर कांबळे ,कोषाध्यक्ष आनंदा कांबळे, एकनाथ कांबळे ( सदस्य ),केशव कांबळे,एम. एस .कांबळे ,लक्ष्मण कांबळे ( पत्रकार ) सुभाष वाघमारे यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . यानंतर पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर त्रिशरण पंचशील एम.एस.कांबळे यांनी व बौद्ध उपासक उपासीका यांनी ग्रहण केले.

त्यानंतर आ. प्रतापराव पाटील चिखलीकर व प्रमुख पाहूण्यांचा शाल ,पुष्पहार देवून जयंती मंडळाकडून यथोचित सत्कार करण्यात आला. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की ,सर्व जाती धर्मातील नागरीकांनी संपूर्ण महामाणवाची जयंती एकत्र साजरी करावी , गावातील विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन दिले. सर्व जयंतीचा अध्यक्ष व पदाधिकारी वर्षभर तेच रहावे कारण गावामध्ये शांतता पूर्ण वातावरण रहाते व गावाची एकत्ता रहाते असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले .या सकाळच्या कार्यक्रमाचे प्रास्तावना नरेंद्र गायकवाड तर सुत्रसंचलन लक्ष्मण कांबळे व बालाजी सोनकांबळे यांनी केले तर आभार गौतम कांबळे यांनी मानले .

दुपारच्या सत्रात पाच वाजता गावातील प्रमुख मार्गावरून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गातील सर्व जातिधर्मातील नागरीक उपस्थित होते.मुरवणूकीच्या वेळी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास व माॅ जिजाऊ चौक येथे जिजाऊ फलक व ग्रामपंचायत कार्यालयातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जयंती मंडळाकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून बुद्ध विहारापासी येवून शांतेत विसर्जन झाले. ही मिरवणूक शांतेत पार पाडण्यासाठी लोहा पोलीस स्टेशन च्या कर्मचा-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

रात्री ठिक नऊ वाजता महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका प्रबोधनकार नालंदा सांगवीकर ( फेम आभाळा येवढी माया )व त्यांचा संच यांच्या सुमधूर आवाजाने बा भिमाला आणि गोतमाला या वंदन गिताने सुरूवात केली आणि एका पेक्षा एक चिंगले भिम गिते गावून शेवटी पत्रात लिहीते रमा चिंता ना करता शिका मी लेकरांना सांभाळीते ,तुम्ही स्वतःला जपा या माता रमाई च्या गिताने महिला ,भगिनी प्रेरीत झाल्या होत्या.

नालंदा सांगवीकर यांनी गीत गायनातून उपस्थितांचे प्रबोधन केले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष अविनाश सोनकांबळे ,उपाध्यक्ष आशिष कांबळे ,सचिव ग्यानोबा वाघमारे ,सहसचिव रत्नाकर कांबळे ,कोषाध्यक्ष आनंदा कांबळे ,एकनाथ कांबळे,केशव कांबळे , अनिल कांबळे ( शिक्षक ), गंगाधर कांबळे ,गणेश कांबळे ,राहुल कांबळे ,आनंदा वाघमारे ,सुभाष वाघमारे , नागोराव गजभारे ,गोविंद भावे ,मधुकर कांबळे , संभाजी कांबळे ,वसंत कांबळे ,उत्तम कांबळे ,मनोहर कांबळे ,प्रमोद वाघमारे ,राम कांबळे,संतराराम कांबळे ,आनंदा मनोहर कांबळे ,गणेश वाघमारे ,विश्वनाथ कांबळे व तक्षशिला महिला मंडळ पोखरभोसी यांच्यासह आदिनी परिश्रम घेवून कार्यक्रम यशस्वी केला.

कालवश जयराम रानबा कांबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जयराम कांबळे यांची मुलगी सौ.सुनंदा केरबा लांडगे यांच्याकडून जयंती निमित्त अन्नदान करण्यात आले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments