HomeकरियरProf. Dr. Deepak Shinde : प्रा. डॉ. दीपक शिंदे यांची केंद्रीय विद्यापीठात...

Prof. Dr. Deepak Shinde : प्रा. डॉ. दीपक शिंदे यांची केंद्रीय विद्यापीठात परीक्षा नियंत्रक म्हणून निवड

नांदेड| येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलाचे प्राध्यापक व माजी संचालक डॉ. दीपक मोहनराव शिंदे यांची केंद्रीय जनजाती विद्यापीठ विशाखापट्टणम (विजयानगरम) येथे परीक्षा नियंत्रक म्हणून निवड झाली आहे. या त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

नांदेड येथील महात्मा गांधी मिशन पत्रकारिता महाविद्यालयाची स्थापना डॉ. दीपक शिंदे यांनी माजी मंत्री कमल किशोर कदम यांच्या मार्गदर्शना खाली केली. त्यानंतर त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पत्रकारिता विभागाचे संचालक म्हणून १४ वर्षे काम केले. या काळात त्यांनी विद्यापीठात अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक मीडिया स्टुडिओ उभा केला. मीडिया विभाग स्वतंत्र इमारतीत स्थलांतरित करण्यात डॉ. शिंदे यांचा मोठा वाटा आहे. विद्यापीठातील श्री गुरुगोविंद सिंगजी अध्यासन संकुल सुरू करून या संकुलासाठी केंद्र शासनाकडून २५ कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यात डॉ. शिंदे यांनी मोठे योगदान दिले आहे. दै. प्रजावाणी, दै. लोकपत्र, दै. नागपूर पत्रिका या दैनिकातून प्रारंभीच्या काळात त्यांनी काम केले आहे. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. उत्कृष्ट पत्रकारिते बद्दल दर्पण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

डॉ. दीपक शिंदे हे विद्यापीठ अनुदान आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या नेट परीक्षेसाठी एनटीए कडून नेमले गेलेले देशाचे समन्वयक आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परीक्षेत्रातील सेट परीक्षेचे समन्वयक म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे. विविध लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीच्या कार्यात पत्रकारिता विषयाच्या कामात ते प्रमुख सहभागी आहेत. NAAC बेंगलोर यांच्या वतीने पाठविण्यात येणाऱ्या समितीचे अनेक ठिकाणी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. देशभरातील सुमारे ४० विद्यापीठात परीक्षेच्या कामात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणा, प. बंगाल राज्यातील व महाराष्ट्रातील बहुतांश विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर सदस्य तर नांदेड व गडचिरोली विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ. शिंदे यांनी काम केले आहे.

केंद्रीय विद्यापीठात परीक्षा नियंत्रक म्हणून त्यांच्या झालेल्या निवडीबद्ल आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. हेमंत पाटील, आ. राजेश पवार, आ. विक्रम काळे, आ. रामराव पवार पाटील, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री डी.पी. सावंत, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन, माजी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. सुधीर गव्हाणे, मा. व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्र चव्हाण, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, संचालक बी.बी. सुरवसे, प्राचार्य डॉ. वसंत भोसले, प्राचार्य गणेश्चंद्र शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments