Dr. Babasaheb Ambedkar ; सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वही,पेन, मिठाई वाटप, पोलीस कर्मचारीसाठी अन्नदान

नवीन नांदेड l सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिडको वृत्तपत्र विक्रेता टिनशेड येथे 14एप्रिल रोजी सकाळी मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे, व नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर व मान्यवरांच्या उपस्थितीत वृत्तपत्र विक्रेता पाल्यांसाठी एक वही एक पेन मिठाई वाटप अभिवादन करण्यात आले.

तर दुपारी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पोलीस कर्मचारी यांना अल्पोपहार वाटप पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला यावेळी पोलीस स्टेशन कर्मचारी व पोलीस होमगार्ड यांच्या सह नागरीक व महिलांनी अन्नदान लाभ घेतला‌ तर नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा वतीने पाणी वाटप व गूलाब‌ पुष्प देऊन नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे यांनी स्वागत केले.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने मार्गदर्शक रमेश ठाकूर व वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अध्यक्ष सतिश कदम बालाजी सुताडे व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वृत्तपत्र विक्रेता पाल्यांसाठी एक वही एक पेन मिठाई वाटप व अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे व माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे यांनी सामाजिक कार्यकर्ते भि.ना.गायकवाड, सेवानिवृत्त भुमि अभिलेख अधिकारी के.ना.जेटेवाड, ॲड.संदीप गायकवाड,रवी थोरात , यांच्या सह मान्यवर यांनी अभिवादन केले, यावेळी जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते शेख सयोध्दीन, मदनसिंह चव्हाण, दौलतराव कदम, यांच्या सह महिला‌ वितरक वंदना लोणे यांच्या सह उपस्थित वृत्तपत्र विक्रेते यांच्या फेटा‌ बांधून स्वागत करण्यात आले. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या जयंती निमित्त पोलीस बंदोबस्तावर कार्यरत पोलीस कर्मचारी यांना व‌ पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड यांना अल्पोपहार पुरी भाजी व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मांटे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड यांच्या सह अनेक कर्मचारी यांनी लाभ घेतला, यावेळी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या कडे पोलीस बंदोबस्तावर कार्यरत कर्मचारी यांना अन्नदान पाॅकेट व‌ पाण्याचा बाॅटल देण्यात आल्या,या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

‌टिन‌शेड वृत्तपत्र विक्रेता यांच्या कडून नागरींकाना अन्नदान पुरी भाजी वाटप‌ करण्यात आले यावेळी सतिश बसवदे, स्वप्नील ढवळे, बापू साहेब‌ पाटील, पत्रकार सुर्यकांत यन्नावार, सुरेश अंबाटवार, यांच्या सह सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button