Mundkar : सर्वांनाच सीमेवर जाऊनच देशसेवा करण्याची आवश्यकता नाही – मुंडकर

बिलोली| सर्वांनाच सीमेवर जाऊन हातात बंदूक घेऊन देश सेवा करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम केल्यास ही सुद्धा देश सेवाच होय.असे प्रतिपादन प्रश्न सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर यांनी केले. ते बिलोली येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित निराधार, वृद्ध आणि दिव्यांगांच्या मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी पोलीस उप निरीक्षक सोमनाथ स्वामी, आगारप्रमुख नरसिंग निमनवाड, सामाजिक कार्यकर्ते माधव आटगोरे यांचे प्रमुख उपस्थिती होती.


मुंडकर पुढे म्हणाले की, येथे उपस्थित असलेले आगार प्रमुख यांनी जन्मतः दिव्यांगांच्या, निराधारांच्या बाबतीत सर्व चालक आणि वाहकांची बैठक घेऊन त्यांना आजच्या कार्यक्रमाविषयी आणि अपंग निराधार यांच्या विषयीच्या संवेदना ज्या ( आगार प्रमुखाच्या मनात निर्माण झाल्या )त्यांच्या मनात निर्माण झाल्या त्या चालक आणि वाहकांच्या मनातही निर्माण कराव्यात ज्यायोगे खऱ्या अर्थाने निराधार, दिव्यांगांना परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करताना, प्रवासात लाभदायक ठरेल. मुंडकर यांचे भाषण सुरू असताना आगारप्रमुखांनी उभे राहून याबाबत जाहीर अभिवचन दिले.

निराधार, वृद्ध आणि जन्मतः दिव्यांगांना त्यांच्या मजबुरीचा फायदा घेत असताना पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते अशावेळी पोलिसांनी पुढाकार घेऊन निराधारांना मदत करण्याची आवश्यकता असते. ज्येष्ठ पत्रकार तथा सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक मुंडकर यांच्या वक्तव्या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ स्वामी यांनी मुंडकर यांच्या विधानांना जाहिर सहमती देऊन या ठाण्याअंतर्गत निराधारावर अन्याय होणार नाही याची पोलीस काळजी घेतील या भावना प्रगट केल्या. माध्यम क्षेत्रातील उपस्थित माध्यम प्रतिनिधींच्या बाबतीतही असेच भूमिका व्यक्त करण्यात आल्या . माध्यमांनी निराधार अपेक्षित यांच्या बाबतीत समाज जागरण करण्यासाठी पुढाकार घेण्याचे गरज असल्याचे व्यक्त करण्यात आले. माध्यमातील उपस्थितांनी यावर सकारात्मक संवेदना प्रकट केल्या.


हाच धागा धरून समन्वयक तथा ज्येष्ठ पत्रकार मुंडकर नंतर पुढे असेही म्हणाले की,सर्वांनाच सीमेवर जाऊन हातात बंदूक घेऊन देश सेवा करण्याची आवश्यकता नाही. तर प्रत्येकाने आपापली जबाबदारी लक्षात घेऊन प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम केल्यास ही सुद्धा देशसेवाच होय. याप्रसंगी अवयव दान समितीचे श्री माधव आटकोरे यांनी आपल्या कार्याविषयीची माहिती उपस्थित निराधार आणि वृद्ध बांधवांना दिली.यावेळी आगार प्रमुख यासह अनेकांनी आपापल्या क्षेत्रात काम करणाऱ्या सहकाऱ्यांना निराधार आणि वृद्धांच्या संवेदना प्रकट करून ही चळवळ लोकाभिमुख केली जाईल अशा भावना व्यक्त केले. समारोप चंपत डाकोरे यांनी केले.यावेळी निराधार आणि वृद्ध बंधू भगिनींनी सभागृह खचाखच भरला होता. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन गौतम भालेराव यांनी केले.




