Mundkar : सर्वांनाच सीमेवर जाऊनच देशसेवा करण्याची आवश्यकता नाही – मुंडकर
बिलोली| सर्वांनाच सीमेवर जाऊन हातात बंदूक घेऊन देश सेवा करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम केल्यास ही सुद्धा देश सेवाच होय.असे प्रतिपादन प्रश्न सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर यांनी केले. ते बिलोली येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित निराधार, वृद्ध आणि दिव्यांगांच्या मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी पोलीस उप निरीक्षक सोमनाथ स्वामी, आगारप्रमुख नरसिंग निमनवाड, सामाजिक कार्यकर्ते माधव आटगोरे यांचे प्रमुख उपस्थिती होती.
मुंडकर पुढे म्हणाले की, येथे उपस्थित असलेले आगार प्रमुख यांनी जन्मतः दिव्यांगांच्या, निराधारांच्या बाबतीत सर्व चालक आणि वाहकांची बैठक घेऊन त्यांना आजच्या कार्यक्रमाविषयी आणि अपंग निराधार यांच्या विषयीच्या संवेदना ज्या ( आगार प्रमुखाच्या मनात निर्माण झाल्या )त्यांच्या मनात निर्मा...
