नांदेडकरियर

ऑफीसर ऑफ दि‌ मन्थ साठी प्रकाश‌ कांबळे तर उत्कृष्ट कर्मचारी म्हणून संजय कुलकर्णी व सौ. सौनटक्के यांच्या सन्मान

नांदेड l प्रधानमंत्री आवास योजना विभागाने लेखा विभाग व लेखापरीक्षण विभाग यांच्या मदतीने आठरा दिवसांच्या कालावधीत दहा कोटी 8लक्ष रूपये निधी वितरित करून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अधिकारी व‌ कर्मचारी यांच्या सन्मान चिन्ह व सत्कार करून प्रकाश‌ कांबळे यांना अफिसर ऑफ दि‌ मन्थ वरीष्ठ लिपीक संजय कुलकर्णी व‌ लिपीक वर्षा सोनटक्के यांना गौरविण्यात आले.

राज्य शासनाने नोडल एजन्सी म्हाडामार्फत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेस दि.10 फेब्रुवारी 25 रोजी रु. 10 कोटी 8 लाख निधी वितरीत केला होता. सदर निधी लाभार्थ्यांना तात्काळ वाटप करण्याचे शासनाचे निर्देश होते. वेळोवेळी शासन स्तरावर मुख्यमंत्री व प्रधान सचिव महोदय यांच्याकडुन व्हिडिओ कॉन्फरन्स व्दारे आढावा घेण्यात येत होता. त्यामुळे सदर निधी वेळेत खर्च करण्याचे आव्हान विभागाकडे उभे होते. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना विभागाने निधी खर्च करण्याचे नियोजन केले.

शासनाची तातडी विचारात घेता प्रधानमंत्री आवास योजना विभागाने लेखा विभाग व लेखापरीक्षण विभाग यांच्या मदतीने दि.10 पासुन ते दि.28 फेब्रुवारी 2025 पर्यंत एकुण 18 दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण 10 कोटी 8 लक्ष निधीच्या संचिका तयार करुन लेखा विभाग व लेखापरीक्षण विभागाच्या मदतीने निकाली काढण्यात आल्या व संपुर्ण निधी लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला. त्यानुसार 10 कोटी 8 लक्ष निधी 18 दिवसामध्ये एकही दिवस सुट्टी न घेता (या कालावधीतील 7 सार्वजनिक सुट्ट्या) रात्री उशिरापर्यंत काम करुन लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेला आहे. त्यामुळे शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे.

त्यामुळे मनपा वर्धापन दिनाच्या निमित्ताने ऑफिसर ऑफ ड राज्य शासनाने नोडल एजन्सी म्हाडामार्फत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेस दि.10 फेब्रुवारी25 रोजी रु. 10 कोटी 8 लाख निधी वितरीत केला होता.

सदर निधी लाभार्थ्यांना तात्काळ वाटप करण्याचे शासनाचे निर्देश होते. वेळोवेळी शासन स्तरावर मुख्यमंत्री व प्रधान सचिव यांच्याकडुन व्हिडिओ कॉन्फरन्स व्दारे आढावा घेण्यात येत होता. त्यामुळे सदर निधी वेळेत खर्च करण्याचे आव्हान विभागाकडे उभे होते,त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना विभागाने निधी खर्च करण्याचे नियोजन केले.

शासनाची तातडी विचारात घेता प्रधानमंत्री आवास योजना विभागाने लेखा विभाग व लेखापरीक्षण विभाग यांच्या मदतीने दि.10/02/2025 पासुन ते दि.28/02/2025 पर्यंत एकुण 18 दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण 10 कोटी 8 लक्ष निधीच्या संचिका तयार करुन लेखा विभाग व लेखापरीक्षण विभागाच्या मदतीने निकाली काढण्यात आल्या व संपुर्ण निधी लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला.

त्यानुसार 10 कोटी 8 लक्ष निधी 18 दिवसामध्ये एकही दिवस सुट्टी न घेता (या कालावधीतील 7 सार्वजनिक सुट्ट्या) रात्री उशिरापर्यंत काम करुन लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेला आहे. त्यामुळे शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण केलेले आह.त्यामुळे आज मनपा वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रकाश कांबळे विभाग प्रमुख यांना ऑफिसर ऑफ द मंथ हा पुरस्कार व संजय कुलकर्णी वरिष्ठ लिपिक लेखा विभाग यांना एम्पलोयी ऑफ द मंथ पुरस्कार व श्रीमती वर्षा सोनटक्के लिपिक प्रधानमंत्री आवास योजना यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!