ऑफीसर ऑफ दि मन्थ साठी प्रकाश कांबळे तर उत्कृष्ट कर्मचारी म्हणून संजय कुलकर्णी व सौ. सौनटक्के यांच्या सन्मान
नांदेड l प्रधानमंत्री आवास योजना विभागाने लेखा विभाग व लेखापरीक्षण विभाग यांच्या मदतीने आठरा दिवसांच्या कालावधीत दहा कोटी 8लक्ष रूपये निधी वितरित करून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अधिकारी व कर्मचारी यांच्या सन्मान चिन्ह व सत्कार करून प्रकाश कांबळे यांना अफिसर ऑफ दि मन्थ वरीष्ठ लिपीक संजय कुलकर्णी व लिपीक वर्षा सोनटक्के यांना गौरविण्यात आले.
राज्य शासनाने नोडल एजन्सी म्हाडामार्फत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेस दि.10 फेब्रुवारी 25 रोजी रु. 10 कोटी 8 लाख निधी वितरीत केला होता. सदर निधी लाभार्थ्यांना तात्काळ वाटप करण्याचे शासनाचे निर्देश होते. वेळोवेळी शासन स्तरावर मुख्यमंत्री व प्रधान सचिव महोदय यांच्याकडुन व्हिडिओ कॉन्फरन्स व्दारे आढावा घेण्यात येत होता. त्यामुळे सदर निधी वेळेत खर्च करण्याचे आव्हान विभागाकडे उभे होते. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना विभागाने निधी खर्च करण्याचे नियोजन ...
