नांदेडक्राईमव्हिडीओ

Unknown thieves broke : हिमायतनगरात अज्ञात चोरट्यांनी दोन ग्राहक सेवा केंद्र आणि एक मोबाईल शॉपी फोडली

हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरात सोमवारी मध्यरात्री ते मंगळवार सकाळच्या दरम्यान मध्यरात्रीला अज्ञात तीन चोरट्याने दुचाकीवर येऊन धुमाकूळ घातला आहे. एकाच दिवशी तीन दुकानाचे शटरचे कुलूप फोडून, शटर वाकवून नगदी रकम मोबाईल आदीसह इतर महागडा माल असा एकूण 70 ते 80 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

हा प्रकार सकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकाना शटर वाकविण्यात आल्याचे लक्षात येताचं हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत व त्यांच्या सहकारी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन चोरीच्या घटनेचा पंचनामा केला. तसेच सीसीटीव्ही फुटेज द्वारे चोरीच्या घटनेचा पुढील तपास सुरू केला असून, एका मोबाईल शॉपी मधून मोठ्या प्रमाणात अँड्रॉइड मोबाईलची चोरी झाल्यामुळे पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञाला पाचारण केले आहे,

ज्या ज्या दुकानाचे शटर फोडले त्या दुकानापर्यंत जाऊन चोरट्यांच्या माग काढण्यासाठी श्वान पथकाने प्रयत्न केला असून, तिथून वाहनाने चोरटे पसार झाले आल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, तर ठसे तज्ज्ञाने मोबाईल शॉप मधून फिंगर प्रिंटचे नमुने हस्तगत केले असून, त्या दिशेने हिमायतनगर पोलीस तपास करत आहेत.

एकूणच हिमायतनगर शहरात अज्ञात चोरट्यांनी रात्री केलेल्या चोरीच्या कारणामुळे व्यापारी वर्ग व नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, चोरट्याने चोरी करून पळ काढल्यानंतर पोलिसांची गाडी रात्र जास्तीत फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असून, चोरट्यांनी तोंडाला मास्क लावल्याचे दिसून येत असल्याने पोलीस कोणत्या भागाकडे गस्त करीत आहेत, याचा माघ घेऊनच चोरटे चोरिच्या घटनेला अंजाम देत असल्याचे यावरून दिसून येत आहे,

या अगोदर हिमायतनगर शहरात अनेक मोठ्या चोरीच्या घटना घडल्या तसेच एक मिल्ट्रीमनचे घर फोडण्यासाठी चोरट्याकडून प्रयत्न झाला, त्या घटनांमध्ये सामील असलेल्या चोरट्यांचा तपास जैसे थेच असताना पुन्हा चोरटे सक्रिय झाल्यामुळे अज्ञात चोरट्यांचा तपास लाऊन चोरांच्या मुसक्या अवळाव्यात आणि शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button