HomeनांदेडBollywood : शिक्षणसम्राट यांच्या चिरंजीवाची बॉलीवूड क्षेत्रात अशीही गगनभरारी

Bollywood : शिक्षणसम्राट यांच्या चिरंजीवाची बॉलीवूड क्षेत्रात अशीही गगनभरारी

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। मातोश्री कमलताई ठमके शैक्षणिक संस्थेचे संचालक तथा अध्यक्ष प्रशांत ठमके यांचे चिरंजीव अभिनेते सुशांत ठमके हे आपल्या पहिल्याच हिंदी चित्रपट ‘पिंटू की पप्पी’ याद्वारे बाॅलिवूडच्या रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.चित्रपट २१ मार्च २०२५ ला मोठ्या दिमाखात प्रदर्शीत होत आहे.आणि चित्रपटाची पूर्ण टिम त्यासाठी सज्ज झाली आहे.

१० मार्च रोजी मुंबई येथे या चित्रपटातील सर्व कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांचेसह प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमिया, गायक उदित नारायण,अभिनेत्री रेखा,अजय देवगण या सारख्या सुपरस्टारच्या उपस्थितीत एक प्रमोशन सोहळा संपन्न करण्यात आला.त्या चित्रपटाला शुभेच्छा ही देण्यात आल्या.त्याचप्रमाणे किनवट येथे ‘पिंटू की पप्पी’ या बिग बजेट हिंदी चित्रपटातील अभिनेता सुशांत ठमके

टिम मधील नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य,माधुरी पवार यांच्यासह ५० कलावंतांच्या संगीत कला व नृत्याचा आविष्कार १८ मार्च २०२५ ला सायंकाळी ५:३० वाजता प्रत्यक्ष नजरांना किनवट व परिसरातील जनतेसाठी मिळणार आहे.सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला असून सर्वांनी परिवारासह पहावा असे अवाहन अभियंता प्रशांत ठमके यांनी केले आहे.’पिंटू की पप्पी’ हा चित्रपट नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य व त्यांच्या पत्नी यांच्या निर्मीतीत संपन्न झाला असून अजय-अतूल सारख्या जागतिक संगीतकारांचे सहयोग या चित्रपटास मिळाले आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने अभियंता प्रशांत ठमके तसेच अभिनेता सुशांतला उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटेयांचेसह माहूरनगरीचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, संस्थापक अध्यक्ष भाग्यवान भवरे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद माहूर तालुकाध्यक्ष शेषराव पाटील यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments