नवीन नांदेड| 8 मार्च जागतिक महिला दिना निमित्ताने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे आलेल्या सर्व तक्रारदार महिला व कार्यरत पोलीस महिला पोलीस कर्मचारी पोलीस यांना निरीक्षक चिंचोलकर यांच्या वतीने भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.


जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तक्रारदार महिलांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या महिला सुरक्षेसंदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.डायएल 112 बाबत माहिती देण्यात आली.

पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे कार्यरत असलेल्या सर्व पोलीस महिला अंमलदार यांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कांबळे,उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड, बाबुराव चव्हाण यांच्या सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
