अर्धापूर| ज्येष्ठ पत्रकार बंधुराज लोणे यांच्या मातोश्री तथा लहान तालुका अर्धापूर येथील रहिवासी जेष्ठ महिला नागरिक राधाबाई संभाजी लोणे वय ८५ वर्ष यांचं दि.२४ रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता राहाते घरी लहान येथे वर्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर दि.२५ रोजी मंगळवारी सकाळी ११ वाजता लहान येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.


कालवश राधाबाई संभाजी लोणे यांच्या पश्चात दोन मुलं,सुना, तिन मुली जावई नातू-पणतू असा मोठा परिवार आहे.त्या मुंबई निवासी व्यावसायिक दिगंबर लोणे व ज्येष्ठ पत्रकार बंधुराज लोणे,माजी सभापती लक्ष्मीबाई हटकर यांच्या मातोश्री व माजी सभापती प्रल्हादराव हटकर यांच्या सासुबाई आहेत. राधाबाई संभाजी लोणे ह्या सर्वांच्या दुःख दुखात सहभागी होणाऱ सामाजिक कार्यात अग्रेसर असणार व्यक्तिमत्व म्हणून परिचित होत्या त्यांचं धम्मकार्यात मोठ्या सहभाग होता त्यांच्या जाण्याने समाजाने कृतीशील व्यक्तिमत्व गमावले आहे.
