नवीन नांदेड l शिवजन्मोत्सव निमित्ताने रमामाता आंबेडकर चौक ते महाराणा पुतळा सिडको हडको परिसरातील मुख्य मार्गावरून ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व पोलीस कर्मचारी यांनी पथसंचलन केले.


शिवजन्मोत्सव निमित्ताने 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको हडको परिसरातील मुख्य मार्गावरून पोलीस पथसंचलन करण्यात आले.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे,विजय कांबळे, रेखा काळे, उपनिरीक्षक गायकवाड, चव्हाण , शिंदे यांच्या सह पोलीस अंमलदार,महिला पोलिस कर्मचारी यांच्या सह होमगार्ड यांच्या समावेश होता.कायदा व सुव्यवस्था अबांधित रहावे यासाठी हे पथसंचलन करण्यात आले.
