Homeक्राईमAccused of illegal sand extraction : अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या आरोपींना अटक;...

Accused of illegal sand extraction : अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या आरोपींना अटक; 3 कोटी 15 लक्ष रूपयाचा मुद्देमाल जप्त

नांदेड| पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट मोहीम सुरु केली आहे. या मोहमेतून नांदेड जिल्हयामध्ये वाळु माफियांसह विविध प्रकारच्या अवैध्य धंद्यांना लगाम लावण्याचा आटोकाट प्रयत्न पोलिसाकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर छापा टाकून मांजरा नदी पात्राच्या रेती घाटावरून अवैद्य वाळू उपसा करून चोरटी विक्री करणारे आरोपींना अटक करून 3 कोटी 15 लक्ष 14,000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्हयामध्ये अवैद्य मार्गाने वाळु उपसा व वाहतुक करून त्याची चोरटया मार्गाने विक्री करून शासनाचा लाखो रूपयाचा महसुल बुडविणाऱ्या अवैद्य वाळु उपसा वाहतुक करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 11.02.2025 रोजी 16.30 वा. ते दिनांक 12.02.2025 रोजीचे 02.00 वा. चे दरम्यान संकेत गोसावी, उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग देगलुर त्यांचे पथक व बिलोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक संयुक्तरित्या कार्यवाही करण्यासाठी मौजे गंजगाव ता. बिलोली जि. नांदेड येथे मांजरा नदीच्या पात्रातुन अवैद्य वाळू उपसा करणारे ठिकाणी अचानक छापा टाकून कार्यवाही केली आहे.

सदर ठिकाणावरून 02 आरोपीसह 23 टिप्पर व ट्रकसह 02 पोकलेन असा एकुण 3 कोटी 15 लक्ष 14,000/ रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कार्यवाहीच्या अनुषंगाने पोस्टे बिलोली येथे आरोपी 1. गणेश रामराव हिवराळे, 2. जाकेर खान मिर्झा खान व ईतर ट्रक व टिप्परचे चालक व मालक तसेच दोन पोकलेनचे चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IMG 20250213 WA0024 Accused of illegal sand extraction : अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या आरोपींना अटक; 3 कोटी 15 लक्ष रूपयाचा मुद्देमाल जप्त

हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब नांदेड (IPS), खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, संकेत गोसावी, उप विभागीय पोलीस अधिकारी, देगलुर यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली रफिक चाँद शेख, उप विभागीय पोलीस अधिकारी, बिलोली, संयय शिंदे, पोनि, पोस्ट बिलोली, दिलीप मुंडे, पोउपनि, पोस्टे बिलोली, पोहेकों/मारोती मुद्देमवार, आनंदा शिंदे, बाबाराव बंडगर, शेख अन्वर, पोकों / अशोक मंडरवार, माधव जळकोटे, गजानन अनमुलवार, व्यंकट घोंगडे, वच्चेवार यांनी केली असून, कार्यवाही यशस्वीपणे पार पाडणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांचे अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी उत्कृष्ठ कामगिरी करीता अभिनंदन केले तसेच अवैद्य वाळू उपसा व वाहतुक करणाऱ्यांवर भविष्यात अजुन कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments