Accused of illegal sand extraction : अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या आरोपींना अटक; 3 कोटी 15 लक्ष रूपयाचा मुद्देमाल जप्त
नांदेड| पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट मोहीम सुरु केली आहे. या मोहमेतून नांदेड जिल्हयामध्ये वाळु माफियांसह विविध प्रकारच्या अवैध्य धंद्यांना लगाम लावण्याचा आटोकाट प्रयत्न पोलिसाकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर छापा टाकून मांजरा नदी पात्राच्या रेती घाटावरून अवैद्य वाळू उपसा करून चोरटी विक्री करणारे आरोपींना अटक करून 3 कोटी 15 लक्ष 14,000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्हयामध्ये अवैद्य मार्गाने वाळु उपसा व वाहतुक करून त्याची चोरटया मार्गाने विक्री करून शासनाचा लाखो रूपयाचा महसुल बुडविणाऱ्या अवैद्य वाळु उपसा वाहतुक करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 11.02.2025 रोजी 16.30 वा. ते दिनांक 12.02.2025 रोजीचे 02.00 वा. चे दरम्यान संकेत गोस...
