नांदेडलाइफस्टाइल

Society changes and revolution takes place through literature : साहित्यातून समाज बदलतो व क्रांती घडते

नांदेड/मुदखेड| साहित्य हे समाजाच्या बदलासाठी एक शक्तिशाली साधन आहे. ते समाजातील समस्या, विषमता आणि अन्यायावर प्रकाश टाकते आणि लोकांना जागरूक करते. साहित्यिक विचार लोकांच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणतात, (Society changes and revolution takes place through literature) जसे की सत्य, न्याय, समानता आणि मानवतेच्या किमतींवर भाष्य करून. साहित्याने अनेक क्रांतिकारी विचारांना जन्म दिला आहे आणि समाजातील संरचनांमध्ये बदल घडविला आहे.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील साहित्य आणि विचारधारांनी लोकांना एकत्र आणले आणि क्रांतीला प्रवृत्त केले. यामुळे, साहित्य समाजातील मूल्ये बदलवून क्रांती घडवू शकते असे उपस्थित रसिक श्रोत्यांना प्रभावित करणारे विचार आपल्या विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवा रुंदावण्याकरिता अव्याहत प्रयत्न करणारे कै.गणपतराव उर्फ बापूसाहेब मेगदे गुरूजी यांच्या पुण्यस्मरण दिनी स्मृतीप्रित्यर्थ नांदेडच्या कुसुम सभागृहात आयोजित व्याख्यानमालेचे बारावी पुष्प गुंफतांना ख्यातनाम कवी व वक्ते अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, गझलकार चंद्रशेखर सानेकर यांनी ‛अशी बोलती कविता’ या विषयावर बोलताना मांडले.

यावेळी व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. आशिष गोदाम गावकर, तर प्रमुख अतिथी म्हणून नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश श्रीमती सुरेखा एस. कोसमतकर यांची उपस्थिती होती .प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कै. गणपतराव उर्फ बापूसाहेब मेगदे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी कै. मातोश्री शकुंतलाबाई यांच्या निधनाबद्दल त्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

समाजाला संस्कार देत आपल्या आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुढाकार घेणारे येथील मेगदे कुटुंबीयांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव यमुना प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.उमेश मेगदे यांचा डॉ.बी.सी.साजणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी वैद्यकीय सेवा व समाज जागृतीसाठी उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बी. सी. साजणे, कृषी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मुदखेड येथील प्रगतीशील शेतकरी प्रसाद मधुकरराव देव यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व रोख ११ हजार धनराशी देवून यमुना प्रतिष्ठानच्या वतीने गौरव करण्यात आला. माहूर येथील रेणुका देवी संस्थानचे माजी विश्वस्त ॲड. विजयकुमार भोपी यांच्या वतीने ही मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

साहित्यिक कलाकृती ही जगासाठी उपयोगी पडणारी असून त्यामुळे ज्ञानाचा प्रसार त्यांच्या माध्यमातून होतो व साहित्य हे समाजाला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन या निमित्ताने बोलताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा एस. कोसमकर यांनी व्यक्त केले. बाहेरील पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यामध्ये मराठवाडा हा सदैव अग्रेसर असून प्रत्येक मुलाची आई मात्र त्याच्यासाठी कवी असते ,छातीत फुले फुलण्याची वाऱ्यावर मन जुळण्याची वेळ निराळी होती ,यासह व्याख्यानमाला आयोजित केलेल्या कार्यक्रमात शब्दांच्या वेगवेगळ्या मांडणीतून तिनं दिग्गज कवींनी आपल्या रचना सादर केल्या.

यामधे अशोक नायगावकर यांनी विनोदी स्वाद , अरुण म्हात्रे यांनी भावनिक आणि प्रेम व चंद्रशेखर सानेकर यांनी गझल रुपाने रसिक श्रोत्यांच्या ह्रदयाचा ठाव घेत खिळवून ठेवले.व दाद घेतली. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. उमेश मेगदे, सचिव उद्योजक रमेश मेगदे, लक्ष्मीकांत मेगदे, नंदकुमार मेगदे, डॉ.सुरेश मेगदे, व कुटुंबीयांनी परिश्रम घेतले व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन ॲड. गजानन पिंपरखेडे यांनी केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button