नांदेडमहाराष्ट्र

Corruption in Mahur Forest Inspection : माहूर वन परिक्षेञात झालेल्या कामांत भ्रष्टाचार – रवि राठोड

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर वन परिक्षेत्र कार्यालयाअंर्तगत २०२०-२१ ते २०२४ ते २५ मध्ये केलेल्या भ्रष्ट कारभाराची त्रयस्थ यंत्रणेमार्फत उच्चस्तरीय चौकशी करून चौकशीअंती संबंधित सर्व दोषीविरुद्ध कठोर कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रवि उत्तमराव राठोड यांनी संबंधीत वरीष्ठ विभागासह मंञालयात पुराव्यासह तक्रार केली आहे.

माहूर वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत सन २०२० -२१ ते २०२४ -२५ पर्यंत करण्यात आलेल्या प्रत्येक कामाच्या नावासह कक्ष क्रमांक तक्रारीत दर्शविण्यात आले आहे. जंगली प्राण्यांकडून शेतीतील पिकांचे नुकसान भरपाईचे अनुदान शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात जमा न करता परस्पर उचल तसेच शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी गाई, म्हशी, बैल, बकरीसह इतर जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मुत्यू झालेल्या प्राण्यांची नुकसान भरपाई अनुदान लाभार्थ्यांना अदा न करता परस्पर बोगस नावे टाकून ते वाउचरद्वारे उचल तसेच विकास कामासंदर्भात असेच काही प्रथम वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत वृक्ष लागवडीचे संगोपन खर्च, रोप तयार करण्याचे खर्च न करता कागदपत्रे दाखवून उचल करण्यात आली असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आहे.

त्याच बरोबर संयुक्त वन समितीच्या माध्यमातून आलेल्या विकास कामाच्या निधीचा कामे न करता कागदोपत्री दर्शवून रकमेची उचल करून अपहार केल्याचे नमूद आहे. विकास कामी प्राप्त झालेला निधी वनपरिक्षेत्रातील प्रत्येक कक्षा मध्ये विकास कामे करण्या कामी वार्षिक इतर ही शेकडो कामांना निधीसह प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली परंतु असे न करता संबंधित अधिकारी, वनपाल, यांनी वनक्षेत्रातील वनरक्षकासोबत संगणमत करून अनेक विकास कामे कागदोपत्री दर्शवून सदरील निधी उचलून अपहार करण्यात आला असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी तक्रारीत नमूद करून मंत्रालयात पुराव्यासह चौकशीची मागणी केली आहे.

माहुर वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत असलेल्या कामाची चौकशी करा
रोप तयार करणे,वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, जंगली प्राण्याकडून शेतक-यांचे पाळीव प्राण्यांचे मयत अनुदान, संयुक्त वनसमिती करण्यात आलेली कामे, वनतळे, टिसीएम, सीसीटी, गॅम्बेयीन बंधारे, पानवठे तयार करणे, मातीनाला बांध, डिप सीसीटी, विश्रामगृह दुरुस्ती, कर्मचारी निवासस्थान दुरुस्ती, कॉन्फरन्स हॉल, कारशेड, कर्मचारी निवासस्थान, कार्यालय नव्याने बांधकाम, साहित्य खरेदी, जाळ रेषा, पेव्हर ब्लॉक बसविणे, कुपन जाळी बसविणे यातील काही कामे केली असून ती निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहे.ऐवढेच नाही तर काही कामे कागदोपत्री दाखविण्यात आली आहे. सदर कामाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात येवून जबाबदार कर्मचारी, अधिका-यावर बडतर्फीसह फौजदारी गुन्हे दाखल करा. अशी मागणी रवि उत्तमराव राठोड, जिल्हाध्यक्ष मनसे नांदेड यांनी केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!