HomeनांदेडNanded-Bidar highway : नांदेड-बीदर महामार्गावर ढाकणी शिवारात उभ्या ट्रकवर दुचाकी धडकली

Nanded-Bidar highway : नांदेड-बीदर महामार्गावर ढाकणी शिवारात उभ्या ट्रकवर दुचाकी धडकली

नांदेड| नांदेड-बीदर महामार्गावर असलेल्या मौजे ढाकणी शिवारात रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी धडकली. या अपघातात दोन युअवक जागीच ठार झाले असून, या घटनेमुळे ढाकणी गावावर शोककळा पसरली आहे. दिनांक ३१ जानेवारी रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली आहे.यात मयत झालेल्या तरुणात चंद्रकांत संभाजी कल्याणकर, वय २७ आणि विजय आनंदा कोल्हे वय २२ वर्ष, दोघेही ढाकणी ता. लोहा येथील आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, ढाकणी ता. लोहा शिवारात भुशाने भरून एका कारखान्याकडे जाणारा ट्रक क्रमांक टीएस ०७, यू, जे. ९५०६हा रात्रीच्या वेळी नादुरुस्त झाला. त्यामुळे हा ट्रक रस्त्याच्या मध्यभागी थांबला होता. तसेच ट्रकच्या पाठीमागे रिफ्लेक्टर अथवा रात्री चमकणारा दिशादर्शक फलक न लावता थांबविलेला होता. याचवेळी सिडको येथून दुचाकी क्रमांक एम. एच. २६ / बी. झेड ६९५३ ही भरधाव वेगाने येऊन उभ्या ट्रकवर आदळली. या अपघातात दुचाकीवरील चंद्रकांत संभाजी कल्याणकर व विजय आनंदा कोल्हे हे जागीच ठार झाले.

accident 1 Nanded-Bidar highway : नांदेड-बीदर महामार्गावर ढाकणी शिवारात उभ्या ट्रकवर दुचाकी धडकली

अपघातातील मयत चंद्रकांत कल्याणकर हा ढाकणी येथील एका कंपनीत कामाला होता. तर दुसरा विजय कोल्हे हा सिडको एमआयडीसी येथील एका कारखान्यात कामाला होता. दोघाही तरुणांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत दोघाही तरुणांचे मृतदेह सोनखेड पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments