HomeनांदेडAtulji Save Appointed ; राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर ; नांदेडच्या पालकमंत्री पदी...

Atulji Save Appointed ; राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर ; नांदेडच्या पालकमंत्री पदी अतुलजी सावे यांची नियुक्ती

मुंबई। महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अतुलजी सावे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जाते आहे.

यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड.आशिष जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

उर्वरित जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची व सहपालकमंत्री पदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :

नागपूर व अमरावती : चंद्रशेखर बावनकुळे,
अहिल्यानगर : राधाकृष्ण विखे-पाटील,
वाशीम : हसन मुश्रीफ,
सांगली : चंद्रकांत पाटील,
नाशिक : गिरीश महाजन,
पालघर : गणेश नाईक,
जळगाव : गुलाबराव पाटील,
यवतमाळ : संजय राठोड,
मुंबई उपनगर : ॲड.आशिष शेलार तर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा,
रत्नागिरी : उदय सामंत,
धुळे : जयकुमार रावल,
जालना : श्रीमती पंकजा मुंडे,
नांदेड : अतुल सावे,
चंद्रपूर : डॉ.अशोक उईके,
सातारा : शंभूराज देसाई,
रायगड : कु.आदिती तटकरे,
लातूर : शिवेंद्रसिंह भोसले,
नंदुरबार : ॲड.माणिकराव कोकाटे,
सोलापूर : जयकुमार गोरे,
हिंगोली : नरहरी झिरवाळ,
भंडारा : संजय सावकारे,
छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाट,
धाराशिव : प्रताप सरनाईक,
बुलढाणा : मकरंद जाधव (पाटील),
सिंधुदुर्ग : नितेश राणे,
अकोला : आकाश फुंडकर,
गोंदिया : बाबासाहेब पाटील,
कोल्हापूर : प्रकाश आबिटकर तर सहपालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ,
वर्धा : डॉ.पंकज भोयर आणि
परभणी : श्रीमती मेघना बोर्डीकर

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments