नांदेडमहाराष्ट्र

Journalism Awards 2024 : राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन – NNL

मुंबई| माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर, 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी, 2025 अशी आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई – 32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in व www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

पुरस्कारांची माहिती (अ.क्र. पुरस्काराचे नाव, पारितोषिक)
1. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय)- 1,00,000/- (रुपये एक लाख रोख) (मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक)
2. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)
3. अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)
4. बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)
5. मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

6. यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)
7. पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) – 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)
8. तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)
9. केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)
10. समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)
11. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)
12. पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व शस्तिपत्र)

13. दादासाहेब पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र, या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
14. अनंतराव भालेराव पुरस्कार, (औरंगाबाद आणि लातूर विभाग)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)
15. आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)
16. नानासाहेब परूळेकर पुरस्कार, (पुणे विभाग)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)
17. शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)
18. ग.गो.जाधव पुरस्कार, (कोल्हापूर विभाग)- 51अ.क्र हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)
19. लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)
20. ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, (नागपूर विभाग)- 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!