HomeनांदेडDemand to set up speed limiter : पिव्हीआर समोर गतीरोधक व ट्रॅफिक...

Demand to set up speed limiter : पिव्हीआर समोर गतीरोधक व ट्रॅफिक सिग्नल उभारण्याची मागणी -NNL

नांदेड| सिडको-हडको भागाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पिव्हीआर समोर गतीरोधक व ट्रॅफिक सिग्नल उभारण्याची मागणी या भागातील युवकानी केली आहे. अन्यथा तिव्र रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा स्थानिकांनी प्रशासनाला निवेदनाव्दारे दिला आहे.

येथील नांदेड शहराला सिडको-हडको भागाशी जोडणाऱ्या रस्त्यावरील पिव्हीआर टॉकीज समोर, नवीन कौठा, कुशीनगर, नांदेड या ठिकाणी वाहनांची सतत वाढणारी गर्दी व भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा अपघात होत आहेत. या भागात सिग्नल किंवा स्पीड ब्रेकर नसल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणे तसेच रस्ता ओलांडणे अत्यंत कठीण झाले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

भरधाव वाहनांमुळे व या भागात सिग्नल व स्पीड ब्रेकर नसल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अपघातांची संख्या वाढत असल्याने, यावर त्वरित उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. स्पीड ब्रेकर व सिग्नल लावल्यास, वाहनांचा वेग नियंत्रित करता येईल आणि नागरिकांच्या सुरक्षेला मदत होईल. तरी याठिकाणी त्वरीत गतिरोधक व ट्रॅफिक सिग्लन उभारावा अशी मागणी या भागातील युवा कार्येकर्ते जय लव्हाळे, सुनील अनंतवार व नागरीकांनी केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments