नांदेडलाइफस्टाइल

Naigaon fire Shop – नायगाव शहरात शॉर्ट सर्किटमुळे दुकान जळून खाक ; लाखो रुपयांचे झाले नुकसान – NNL

नायगाव।शहरात शॉर्ट सर्किटमुळे दुकान जळून खाक होण्याची दुर्घटना दिनांक 31/ 12/2024 रोजी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास दत्तनगर धनंजय कॉम्प्लेक्स येथे घडली यात मोठं नुकसान झाले आहे.

शहरातील शिवपार्वती कन्स्ट्रक्शनरी अँड जनरल स्टोअर्स किराणा या होलसेल दुकानाला भीषण आग लागली होती. नायगाव येथील नरसी रोड धनंजय कॉम्प्लेक्स शिवपार्वती कन्फेशनरी जनरल स्टोअर्स अँड किराणा हे दुकान लगत असलेले गजानन पा. चव्हाण यांचे जनसंपर्क कार्यालय देखील जळून खाक झाले आहे.

दुकानदार मालकाने काल दिनांक 30 / 12/ 2024 रोजी दुकान रात्रीला 10.30 वाजता दरम्यान बंद करून घरी गेले. घटनेची माहिती दस्तगीर मामू यांनी फोन करून गणेश भाऊराव देगावे व गजानन शंकरराव चव्हाण यांना कळविले की दुकानाला आग लागून धूर निघत आहे. असे कळतात या दोघांनी वेळ अंदाजे पहाटे अडीच ते तीन वाजता नगरपंचायत व पोलीस प्रशासकीय अधिकारी यांना कळवून अग्निशामक गाडी बोलावून 31 /12/ 2024 रोजी पहाटे तीन ते सकाळी सात वाजेपर्यंत आग वीजवण्यासाठी  मोहीम राबविले.

नगरपंचायत व पोलीस प्रशासन सह सर्व सहकाऱ्यांनी व गावातील गावकऱ्यांना सोबत घेऊन अग्निशामकाच्या साह्याने आग वीजवली. त्यात दुकानातील कन्फेशनरी व जनरल स्टोअरचे व किराणा सामान व फर्निचर व कागदपत्र, जीएसटी बिल, पैसे महत्वाचे कागदपत्र जळून खाक झाले. या आगीमध्ये अंदाजे 43 ते 45 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. या घटनास्थळी आमचे तालुका प्रतिनिधी जाय मोक्यावर जाऊन पाहणी केली व सकाळी आठ ते नऊ च्या सुमारास आग ही आकोट्यात आली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button