HomeनांदेडPandit Pradeepji Mishra : आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांची शिव...

Pandit Pradeepji Mishra : आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांची शिव महापुराण कथा नोव्हेंबर २०२६ मध्ये -NNL

नांदेड| आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांची शिव महापुराण कथा ऐकण्याची नांदेडकरांना पुन्हा एकदा संधी मिळणार असून, दि. १९ ते २५ नोव्हेंबर २०२६ दरम्यानची तारीख नांदेडसाठी आरक्षित करण्यात आल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ऍड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेच्या गर्दीचे नवीन नवीन विक्रम होत आहेत. या आठवड्यात दुबई येथे झालेल्या कथेला अनिवासी भारतीयांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता.सप्टेंबर महिन्यात नांदेड येथे झालेल्या पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेसाठी पाच लाख पेक्षा जास्त जनसागर जमला होता. दोन दिवस पाऊस पडल्यामुळे कथेमध्ये व्यत्यय आला होता. तेव्हापासून दिलीप ठाकूर हे नांदेड येथे आणखी एकदा आयोजन करण्यासाठी प्रयत्नशील होते.

परंतु वर्ष २०२९ पर्यंतच्या सर्व तारखा आधीच आरक्षित झालेल्या होत्या. दिलीप ठाकूर हे स्वतः दोन वेळा सिहोर येथे कथेच्या आयोजनासाठी गेले होते. शेवटी त्यांच्या आग्रहानुसार २०२६ ची तारीख मिळालेली आहे. सात दिवस नांदेडमध्ये होणारी शिव महापुराण कथा अभूतपूर्व होण्यासाठी एक हजार सक्रीय सदस्य बनविण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकरच एक व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments