महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सर्वप्रथम – NNL

मुखेड, रणजित जामखेडकर। शहरातील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रिकेट संघ तालुकास्तरावर घेण्यात येणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत सर्वप्रथम ठरला आहे .
 मागील अनेक दिवसांपासून तालुकास्तरीय विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आले होते . यापैकी क्रिकेट स्पर्धेत शाहीर अण्णाभाऊ साठे कनिष्ठ महाविद्यालय , मुखेड या संघाचा पराभव करून यश मिळविले आहे . विजयासाठी १४१ इतक्या धावसंख्येचे लक्ष होते . ते लक्ष अतिशय सुरेख खेळ करत पूर्ण केले . 
       
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे, उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , अधिक्षक एस.के.सुर्यवंशी , पर्यवेक्षक प्रा.जी.एम. वायफणकर , क्रीडा मार्गदर्शक डॉ. जे.जी.कहाळेकर , डॉ. एस.बी.गायकवाड , तालुका क्रीडा संयोजक प्रा.एन.आर पोटफोडे , प्रा .सुधीर लांडगे , प्रा. गंदपवाड तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करून कौतुक केले जात आहे .

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button