Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
  • Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - An unknown thief looted an amount a farmer’s bag : कापूस विक्रीचे पैसे भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याच्या थैलीतून अज्ञात चोरट्यानी केली लाखाची रक्कम लंपास -NNL
नांदेड क्राईम December 11, 2024

An unknown thief looted an amount a farmer’s bag : कापूस विक्रीचे पैसे भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याच्या थैलीतून अज्ञात चोरट्यानी केली लाखाची रक्कम लंपास -NNL

हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बैंकेत व्यापारी, नागरिक, शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
NNL TeamBy NNL TeamDecember 11, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर,अनिल मादसवार। शेतातील कापूस विकून आलेली रक्कम जमा करण्यासाठी भारतीय स्टेट बैंकेत येऊन कैश काउंटरच्या लाईनला उभे असलेल्या एका शेतकऱ्याच्या थैलीतून कोण्यातरी अज्ञात महिला व पुरुष चोरट्यानी एक लक्ष रुपयाची रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, वारंवार हिमायतनगर येथील एसबीआय बैंकेतून अश्या प्रकारे रक्कम चोरी होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी सुरक्षा गार्ड नेमण्यात आल्यानंतर देखील बैंकेतून चोरी झाल्याने ग्राहक वर्गातून आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या बाराळी तांडा येथे वास्तव्य करणारा शेतकरी गणपत लखू जाधव या शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामातील काढणीला आलेल्या कापसाची वेचणी केली. आणि कापसाचे भाव वाढत नसल्याने अखेर ०३ डिसेंबरला घरातील कापसाची विक्री व्यापाऱ्याकडे केली होती. आज कापसाची रक्कम व्यापाऱ्याकडून मिळाल्यानंतर त्यापैकी एक लक्ष रुपयाची रक्कम भारतीय स्टेट बँकेमध्ये रक्कम डिपॉझिट करण्यासाठी दिनांक ११ रोज बुधवारी घेऊन आला होता. बुधवार आठवडी बाजार आणि रब्बी हंगाम सुरु असल्याने हिमायतनगर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या बैंकेत गर्दी होत असल्यामुळे शेतकरी बैंकेच्या लाईनमध्ये रक्कम भरण्यासाठी उभा होता.

रक्कम भरण्याचा नंबर आल्यानंतर कैश काउंटर खिडकी जवळ शेतकऱ्याने कैशियरला डिपॉजिट स्लिप देऊन नायलॉनच्या थैलीतून रक्कम काढण्यासाठी हात टाकला. यावेळी थैलीतील एक लक्ष रुपये गायब झाल्याचे शेतकयांच्या लक्षात आले. यावरून पाठीमागे लाईनमध्ये उभे असलेल्या अज्ञात चोराने शेतकऱ्यांच्या थैलीतून रक्कम अलगदपणे काढून चोरून नेले असतील असा संशय आल्याने शेतकऱ्यांनी तात्काळ बैंकेच्या शाखाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांना रक्कम चोरीला गेल्याची माहिती दिली.

शाखाधिकारी यांनी लागलीच हिमायतनगर येथील पोलिसांना बोलावून त्यांच्या उपस्थितीत कैश काउंटर लाईनच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी पाठीमागे उभे असलेली एक महिला आणि पुरुषाने संगनमताने शेतकऱ्याची रक्कम लंपास केल्याचे दिसून आले. हा सर्व प्रकार भारतीय स्टेट बैंकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या संदर्भात शेतकऱ्याने पोलिसांना तक्रार दिली आहे. यावरून हिमायतनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसबीआय मध्ये घडलेल्या चोरीच्या घटनेचा पूढील तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी जमादार कोमल कागणे आणि हेडकोन्स्टेबल नागरगोजे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना तातडीने चोरट्यांच्या शोधात पाठविले आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बैंकेतून एका व्यापाऱ्यांची आणि एका शिक्षकाची मोठी रक्कम चोरीला गेली होती. गतवर्षी एका मायक्रो फायनानांस कंपनीच्या सुपरवायजरच्या बैगेतून रक्कम चोरीला गेली होती. त्या घटनेचा तपास जैसे थेच असताना पुन्हा यावर्षी रब्बी हंगामाच्या काळात शेतकऱ्याची रक्कम चोरीला गेली आहे. सीसीटीव्ही कैमेऱ्यात आरोपी दिसत असताना चोरट्याचा शोध पोलिसांना लावता आला नाही. त्यामुळे बैंकेत रक्कम काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याच्या रक्कमेवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला असल्याचे दिसून येत आहे. 

An unknown thief stole an amount of lakhs from the bag for the sale of cotton of a farmer who came to pay
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleProtest march in Deglaur : बांगलादेशी अत्याचारा विरुद्ध देगलूरात निषेध मोर्चा -NNL
Next Article Storytelling by Ram Tarte today at Narangal : राम तरटे यांचे आज नरंगल येथे कथाकथन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Recruitment postal insurance : डाक जीवन विमा योजनेसाठी विमा सल्लागार भरती : नांदेड येथे थेट मुलाखती

January 17, 2026

Gajanan Patil ; गोदावरी अर्बन बँक शाखा सिडकोचे शाखाधिकारी गजानन पाटील यांच्या उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव

August 22, 2025

Inauguration of Rajesh Pavde’s Public Relations Office : राजेश पावडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन -NNL

August 12, 2024

The march hit Hadgaon tehsil office : स्वराज्य संघटनेचा बैलगाडी आक्रोश मोर्चा हदगाव तहसील कार्यालयावर धडकला -NNL

September 18, 2024
Advertisement
टॉप बातम्या

All the pilgrims in the 24th Amarnath Yatra are in good health | चोविसाव्या अमरनाथ यात्रेतील सर्व १०३ यात्रेकरूंची प्रकृती उत्तम -NNL

Five policemen in Nanded suspended : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी नांदेड मधील पाच पोलीस निलंबित -NNL

Illegal transport of sand ; अवैध रेतीची चोरटी वाहतूक, दोन वाहने जप्त, दोन जणांविरुद्ध विरूद्ध गुन्हा दाखल

Relief and Rehabilitation Minister Anil Patil’s visit : मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा दौरा -NNL

Savitribai Phule Jayanti ; नवीन नांदेड -राजश्री पब्लिक स्कूल सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?