नवीन नांदेड l सिडको भागातील सराफा बाजारात पोलीस पेट्रोलिंग गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना ग्रामीण पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष भेटून सराफा असोसिएशन अध्यक्ष गिरीधर मैड व पदाधिकारी यांनी निवेदन दिले असून चर्चा ही केली.
मागील गेल्या दोन वर्षापुर्वी सिडको सराफा बाजारात असलेल्या तीन ते चार दुकानातुन संबंधित व्यापारी यांच्यी सोनं चांदी दांगीने ऐवज असलेली बॅग भर दिवसा मुख्य बाजारपेठ मधुन अज्ञात चोरांनी दुचाकी वरून पळविली होती, यानंतर सराफा बाजारात रोज सकाळी 9 व सायंकाळी 6ते 9 दरम्यान पोलीस गस्त दैनंदिन होती,परंतु यानंतर ही गस्त बंद झाली असुन बाजारात काही अनोळखी इसम संशयास्पद फिरत आहेत, यामुळे बाजारपेठेत दहशत वातावरण निर्माण झाले असून तात्काळ गस्त वाढवावी अशी मागणी सराफा असोसिएशन अध्यक्ष गिरीधर मैड, उपाध्यक्ष रितेश दहिवाळ,सचिव गुरूप्रसाद डहाळे, कोषाध्यक्ष प्रमोद शहाणे, सहसचिव दिपक टाक, संतोष पांचाळ, भालचंद्र दिक्षीत,अमोल धानोरकर,अनिल पांचाळ,गोपाळ बोकण यांच्या सह असोसिएशन पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते.