HomeनांदेडVigyan Bharati ; विज्ञान भारतीची राज्यस्तरीय विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षा विद्यार्थी विज्ञान...

Vigyan Bharati ; विज्ञान भारतीची राज्यस्तरीय विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षा विद्यार्थी विज्ञान मंथन या‌ वर्षी नांदेड येथे ; NNL

नवीन नांदेड l विज्ञान भारतीतर्फे दरवर्षी घेण्यात येणारी देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच “विद्यार्थी विज्ञान मथन”. या परीक्षेतील राज्यस्तरीय पातळीची परीक्षा या वर्षी नांदेड येथे येत्या ८ डिसेंबरला श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी, नांदेड येथे होत आहे.
ही परीक्षा विज्ञान भारतीच्या सोबत एनसीईआरटी आणि एनसीएसएम, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते.

या‌ वर्षीचे देवगिरी प्रात (मराठवाडा खान्देश) आणि विदर्भ प्रांत येथील विद्यार्थ्यां साठीचे राज्यस्तरीय शिबीर हे नांदेड येथील श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियात्रिकी व तत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी, नांदेड येथे संपन्न होणार आहे. परीक्षा सपन्न झाल्यावर विद्यार्थ्यांची शास्त्रज्ञांसोबत चर्चा हे सत्र घेण्यात येते. त्या करिता आपल्या नांदेड मधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर हे उपस्थित राहणार असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, त्या सोबतच विद्यार्थ्यांसमवेत येणाऱ्या पालकासाठी देखील विशेष माहितीपूर्ण अशा सत्राचे नियोजन करण्यात आलेले आहे.

प्रामुख्याने ज्येष्ठ विज्ञान प्रसारक डॉ. रजन गर्ने, नवीन शैक्षणिक धोरणाच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीचे सदस्य डॉ.अजय महाजन,छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम च्या विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औधकर यांचा समावेश असेल अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे आणि विज्ञान भारती देवगिरी प्रांताचे श्री अमोल कुभलकर यांनी दिली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments