नांदेड| बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आज एक प्रसिद्ध पत्र जारी केले आहे आणि या प्रसिद्धी पत्रकातून 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी नांदेडमध्ये दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा व तिवृ स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
तसेच साळवे पुढे म्हणाले की, नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या आहेत तर नांदेड जिल्ह्यात नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूका संपन्न झाल्या आहेत. कधी नव्हे तेवढ्या यावेळी मोठ्या संख्येने महायुतीच्या जागा नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आल्या आहेत तर या सर्व महायुतीच्या जागा ईव्हीएम मशीनमध्येच काहितरी गरबड करून आल्या असल्याचा आरोपही मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे किंबहुना हि शंका सहाजिकच वर्तवली जात आहे.
कारण महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांना सुद्धा यावेळी पराभूत व्हावे लागले असल्याचे म्हणत साळवे यांनी दिव्यांगांचे आधारस्तंभ माजी मंत्री बच्चु कडु यांचा पराभव मान्य नसल्याचे म्हणत एकप्रकारे ईव्हिएम मशीनमध्येच घोळ झाला. असे म्हनत त्याठिकाणी बॅलेट पेपरवर फेरमतदान करण्यात यावे किंवा बच्चु कडु यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात यावे कारण नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील असा एकही आमदार नाही.
जो विधानसभेत दिव्यांगांच्या न्याय, हक्क मागण्यासाठी आवाज उचलू शकेल त्यांना न्याय हक्क मिळवून देऊ शकेल त्यामुळे बच्चु कडु यांचे राजकीय पुनर्वसन झालेच पाहिजे म्हणून आम्ही सारे बच्चु कडु हि मागणी व दिव्यांगांच्या प्रलंबित विविध मागण्यांसंदर्भात ज्यामध्ये,दिव्यांग व्यक्तीसाठींचे अधिनियम RPWD ACT २०१६ व महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग धोरण २०१८ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, दिव्यांगांच्या हक्काचा दरवर्षीचा ३० लक्ष रूपये आमदार खासदार निधी दरवर्षी खर्च करण्यात यावे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांगांचे मानधन ५ हजार रुपये करण्यात यावे, अंत्योदय राशन कार्ड, हक्काचे घरकूल, स्वयंरोजगारासाठी जागा,गाळे, शासकीय निमशासकीय अनुशेष भरणे, मुकबधीर कर्णबधिर दिव्यांगांसाठी स्वतंत्र चिन्हांकित वाहन व वाहन परवाना वितरीत करणे, अपंग दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून ५० टक्के सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून द्यावे, मयत दिव्यांगांच्या परीवाराचे पुनर्वसन करावे,या व इतर विविध मागण्यांसंदर्भात मंगळवार दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी जागतिक दिव्यांग दिनी नांदेडमध्ये आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे म्हटले आहे.
हा आक्रोश मोर्चा जागतिक दिव्यांग दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा रेल्वे स्टेशन समोर नांदेड येथुन जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन कार्यालयांसह संबंधित सर्वच शासकीय कार्यालयात धडकणार आहे व एकापेक्षा अनेक प्रकारचे विविध तिवृ स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करण्यात येणार आहे तरी नांदेड जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगांनी या आक्रोश मोर्चा व आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष चंपतराव पाटील डाकोरे कुंचेलीकरसह, दिव्यांग आघाडी मुखेड देविदास बद्देवाड, आदित्य पाटिल आणि सर्व मुकबधीर/कर्णबधिर/ब्लाइंड संघटनेसह सकल बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती नांदेड कडून आज करण्यात आली आहे.