protest march in Nanded : आम्ही सारे बच्चु कडु जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगांचा नांदेडमध्ये आक्रोश मोर्चा -NNL
नांदेड| बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आज एक प्रसिद्ध पत्र जारी केले आहे आणि या प्रसिद्धी पत्रकातून 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी नांदेडमध्ये दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा व तिवृ स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
तसेच साळवे पुढे म्हणाले की, नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या आहेत तर नांदेड जिल्ह्यात नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूका संपन्न झाल्या आहेत. कधी नव्हे तेवढ्या यावेळी मोठ्या संख्येने महायुतीच्या जागा नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आल्या आहेत तर या सर्व महायुतीच्या जागा ईव्हीएम मशीनमध्येच काहितरी गरबड करून आल्या असल्याचा आरोपही मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे किंबहुना हि शंका सहाजिकच वर्तवली जात आहे.
कारण महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांना सुद्धा याव...
