HomeनांदेडWebcasting ; वेबकास्टिंगच्या माध्यामातून दिवसभर करडी नजर -NNL

Webcasting ; वेबकास्टिंगच्या माध्यामातून दिवसभर करडी नजर -NNL

नांदेड। जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकिची प्रक्रिया आज सकाळपासून सुरू झाली. या दरम्यान संपूर्ण मतदान प्रक्रियेवर वेबकास्टिंगच्या माध्यमातून दिवसभर देखरेख ठेवण्यात आली. नांदेड जिल्हयातील एकूण ३०८८ केंद्रापैकी १७८१ केंद्रावर वेब कॅमेराव्दारे (प्रत्येक केंद्रावर दोन कॅमेरे) निगराणी ठेवली जात होती.

IMG 20241120 WA0034 Webcasting ; वेबकास्टिंगच्या माध्यामातून दिवसभर करडी नजर -NNL

नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघासाठी ३०८८ हजारापेक्षा अधिक मतदान केंद्र होते. दरम्यान सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरू झाल्यानंतर मतदान केंद्रावर वेबकास्टिंगच्या माध्यमातून जिल्हा‍ नियंत्रण कक्षात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, प्रशांत शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व अन्य अधिका-यांनी मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवली. जिल्हाभरात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments