नवीन नांदेड। सर्वसामान्य कामगारांची दिवाळी देखील गोड व्हावी या हेतूने दरवर्षी काही ना काही उपक्रम राबविणाऱ्या अनंतवार परिवाराने १ नोव्हेंबर रोजी महापालिका कामगारांची दिवाळी गोड केली आहे.
दीपावली निमित्ताने राष्ट्रीय कलाल,गौड, तेलंग समाज युवा संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष तथा कलाल,गौड, तेलंग समाज युवा प्रतिष्ठान च्या वतीने महानगर पालिकेच्या मनपाच्या प्रभाग क्र 19 व 20 मधील स्वच्छता निरीक्षक किशन अर्जुन वाघमारे व अर्जून बागडी यांच्या सोबत असणारे पुरुष कामगार व महिला कामगार यांचा मिठाई,मानाचा फेटा,शाल, पुष्पहार, साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.तसेच त्यांचे मनोबल वाढवून त्यांच्या सोबत राहण्याचे आश्वासन दिले.
सामाजिक कार्यकर्ते सुनील अनंतवार व त्यांच्या संघटनेच्या वतीने अनेक समाज उपयोगी विविध उपक्रम राबविले जातात.त्याच धरतीवर दिवाळीच्या पावन पर्वात कामगार,कर्मचारी व वेगवेगळ्या घटकातील आपल्या लोकांसोबत साधेपणाने सन उत्सव साजरे केले जातात. तो कामगारांच्या सन्मानाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थितीत कॉ गंगाधर गायकवाड आयोजक सुनिल अनंतवार, बाबाराव नंदेवार,शंकर रायपलवार,अनिल अनंतवार, मनोज अनंतवार, शिला अनंतवार,प्रियांका अनंतवार,अंजली अनंतवार आदींची उपस्थिती होती.