Rotary Club of Nanded : रोटरी क्लब नांदेड आणि नंदिग्राम यांची कार्यालयीन प्रांतपाल भेट संपन्न -NNL

नांदेड| येथील रोटरी क्लब नांदेड आणि नंदिग्राम यांच्या कार्यालयीन प्रांतपाल भेट या कार्यक्रमात डिस्ट्रिक्ट चे प्रांतपाल डॉ सुरेश साबु ,सहप्रांतपाल मुरली भुतडा आणि नजीब पठाण हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते तर रोटरी क्लब नांदेड चे अध्यक्ष रो. डॉ संजय पतंगे आणि सचिव रो. सुरेश आंबुगेकर तसेच नंदीग्राम क्लब च्या अध्यक्षा रो. रेखा गरुडकर आणि सचिव डॉ सुरभी राठोर , नांदेड क्लब चे चार्टर प्रेसिडेंट डॉ. वेंकटेश काब्दे यांच्या हस्ते प प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले .


यावेळी दोन्ही अध्यक्ष आणि सचिव यांनी उपस्थितांना आपल्या क्लब तर्फे झालेल्या समाज उपयोगी प्रकल्पाची माहिती सांगितली. तसेच या कार्यक्रमात रोटरी क्लब नांदेड तर्फे जल स्वराज्य प्रकल्प संस्था नगडारवाडी , अॅड.. गजानन पिंपरखेडे , श्री विपुल राठोड , डॉ. अशोक कलंत्री , श्री.नागनाथ गुज्जलवार, डॉ. अनिल साखरे आणि नंदिग्राम क्लब तर्फे सौ. अनुजा शंतनू डोईफोडे , सौ. सुरेखा पाटणी, व डॉ. राहुल कांबळे मुखेड यांना रोटरी एक्सलन्स व्होकेशनल अवॉर्ड देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थिंना मार्गदर्शन करतांना प्रांतपाल सुरेश साबु यांनी रोटरीच्या माध्यमातून जगा मध्ये होत असलेल्या प्रकल्पाची माहिती दिली.

सदरील कार्यक्रमासाठी माजी प्रांतपाल किशोर पावडे, कैलास काला, डॉ शुभांगी पतंगे, डॉ शिवाजी वाडेकर, डॉ करुणा पाटील, डॉ देवेंद्र पालीवाल, डॉ मालू, प्रशांत देशमुख, नागेश देशमुख, धनंजय नलबलवार, प्रशांत गुर्जर, उमेश गरुडकर, नितीन भारतिया, डॉ अश्विन लवेकर, शाम गंदेवार, सुरजीतसिंह खालसा,भास्कर कोंडा, स्मिता गंदेवार, दिपाली पालीवाल, डॉ शुभांगी पाटील, डॉ पुष्पा गायकवाड, मीतेश मालिवाल. ईत्यादी उपस्थित होते तर रो. आशुतोष राठोर व रो. दुर्गा गिरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.





