बिलोली, गोविंद मुंडकर| विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशातला धुडकाळून बिलोली शहर आणि परिसरात मटका सुरू आहे. याबाबत स्थानिक पोलिसांना पुरेशी माहिती असताना सुद्धा अद्याप कार्यवाही का करण्यात आली नसावी? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप हे येताच अनेक अवैध धंदे करणाऱ्यांनी आपले वेगवेगळे हत्यारे खाली टाकले. काहींनी पैशाचे आमिष, राजकारणाचा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र शहाजी उमाप यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे अवैध धंदे बंद करण्यात आले. असे असले तरी बिलोली शहर आणि परिसरात मटका हा सुरूच आहे. यापूर्वी सगरोळी फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात तेलंगाना भागातील लोकांना घेऊन जुगार सुरू होता. विशेष म्हणजे यासाठी पोलिसांनी ठराविक रक्कम सुद्धा घेतल्याचे सांगण्यात येते. या कालावधीत जुगार आणि मटका दोन्ही मोठ्या प्रमाणात अगदी उघड सुरू होते. आता जुगार लपून छपून तर मटका ठराविक ठिकाणी बिनधास्त सुरू आहे.
याबाबत माहिती घेतली असता स्थानिक पोलिसांना आणि संबंधित विभाग आणि व्यक्तींना सांभाळून हा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात आले. शहाजी उमाप सारख्या अधिकाऱ्यांना न जुमानता सुरू असलेला अवैध प्रकार कोणाच्या धाडसाने सुरू आहे ? याबाबतही उलट सुलट चर्चा ऐकव्यास मिळाली. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक पथकातील पोलिसांच्या नजरेतून मटका सुरू असलेल्या कसा सुटला? स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष कार्यवाहीतही हे कसे नजरेस पडले नाही? ही बाब चर्चेला आली आहे. याबाबत पोलीस विभाग काय भूमिका घेत याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.