HomeनांदेडHelpline number 1098 activated : संकटग्रस्त बालकांना मदतीसाठी हेल्पलाईन नंबर 1098 कार्यान्वित...

Helpline number 1098 activated : संकटग्रस्त बालकांना मदतीसाठी हेल्पलाईन नंबर 1098 कार्यान्वित -NNL

नांदेड| आपल्या आजूबाजूला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके, सापडलेली बालके, सोडून दिलेली बालके, बालविवाह, संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरीत आवश्यक मदत कुठून कशी मिळवून देता येईल, याकरीता कुठे संपर्क करावा याबाबत सामान्य नागरीकांमध्ये संभ्रम असतो. यासाठी आता चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 कार्यान्वित करण्यात आली.

संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीसाठी भारत सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणी व संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा 1098 संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्पलाइन सेवा उपलब्ध आहे.

या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही सदर सेवेद्वारे बालकांना मदत मिळवून देऊ शकतात. या संबधी माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाते. याद्वारे संकटग्रस्त बालकांना मदत करण्यासाठी संबंधीतांनी 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर. पी. रंगारी यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments