Wednesday, May 13

Himayatnagar celebrates Vijaydashmi : हिमायतनगर वाढोण्यात सोने लुटून आणि रावण दहनाने विजयदशमी साजरी – NNL

हिमायतनगर,अनिल मादसवार| विश्व हिंदू परिषद व बजरंगदलाच्या वतीने अहंकाररूपी रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याच्या दहन करून, येथील श्री परमेश्वर मंदिराच्या वाढोणा नगरीत विजयदशमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तर कालिंका मंदिरातून निघालेल्या मिरवणुकीतील नागरिकांनी सोने लुटून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जय श्रीराम.. जय जय श्रीराम…भारत माता कि जय… वंदे मातरम… कालिंका माता कि जय… व्यंकटेश बालाजी कि जय…. च्या घोषणांनी वाढोणा शहर परिसर दणाणून निघाला होता.

IMG 20241012 205216 Himayatnagar celebrates Vijaydashmi : हिमायतनगर वाढोण्यात सोने लुटून आणि रावण दहनाने विजयदशमी साजरी - NNL

हिमायतनगर शहरातून दरवर्षीप्रमाणे पारंपारीक पध्दतीने सोने लुटण्यासाठी येथील कालिंका मंदिरापासून ढोल – तश्याच्या गजरात हाती मशाल घेऊन पारंपरिक पद्धतीने भव्य दसरा मिरवणूक काढण्यात आली होती. यात गावातील प्रमुख लोकांनी सहभाग घेऊन सोने लुटले. त्यानंतर शहरातील सर्व देवी – देवतांचे दर्शन घेऊन ग्रामस्थांची भेट घेवून एकमेंकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच हिमायतनगर शहरातील व्यंकटेश बालाजी मंदिरात गोविंद – गोविंदाच्या गजरात दर्शनासाठी नागरिकांची तोबा गर्दी केली होती. शहरातील कालिंका माता, बालाजी मंदिर, लकडोबा हनुमान मंदिर, दक्षिणमुखी हनुमान मंदिर, पावनसुत हनुमान मंदिर, परमेश्वर मंदिरासह सर्वच मंदिरातठिकठिकाणच्या मंदिरातही मोठ्या प्रमाणात महिला – पुरुषांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

IMG 20241012 181539 Himayatnagar celebrates Vijaydashmi : हिमायतनगर वाढोण्यात सोने लुटून आणि रावण दहनाने विजयदशमी साजरी - NNL

त्यानंतर रात्री ९ वाजता हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत विश्वहिंदू परिषद व बजरंगदलाच्या वतीने ३५ फुट उंचीच्या रावणाचे दहन करण्यात आले. गेल्या १६ वर्षापासुन हिमायतनगर विश्व हिंदू परिषद व बजरंग दल शाखेच्या वतीने रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. रावण दहनाच्या वेळी झालेल्या फटाक्यांची आतिषबाजी पाहून नागरिकांचे डोळे दिपून गेले होते. यावेळी शहरातील हजारोच्या संख्येत हिंदू महिला – पुरुष व युवकांनी फटाक्याच्या अतिशबाजीत होणाऱ्या रावणाच्या दहनाचा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. टापूर्वी उपस्थितांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन आपल्यातील अहंकारमय रावणाच्या वृत्तीचा त्याग करण्याचे आवाहन दत्त संस्थान दिघी येथिल मठाधीपती आनंदगीर देवगिर महाराज यांनी उपस्थितांना केले.

IMG 20241012 205046 Himayatnagar celebrates Vijaydashmi : हिमायतनगर वाढोण्यात सोने लुटून आणि रावण दहनाने विजयदशमी साजरी - NNL

रावण दहनाची तयारी करण्यासाठी बजरंग दल स्वयंसेवक युवकांनी मेहनत घेतली दिनांक १२ रोज शनिवारी रात्रीला ९ वाजता आयोजित रावण दहनाचा कार्यक्रम चिमुकल्या बालकाच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी रावण दहनाच्या कार्यक्रमाला विश्वाहिंदू परिषद किनवट जिल्हाध्यक्ष श्याम रायेवार, बजरंग दलाचे माजी तालुका संयोजक गजानन चायल, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, बंजरग दल तालुका संयोजक सोपान कोळगिर, शिवम गाजेवार आदीसह बजरंग दल कार्यकर्ते व शहरातील रामभक्त मंडळी हजारोच्या संख्येने उपस्थित झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!