HomeनांदेडDnyaneshwar Bhartiji Maharaj : मठाधिश श्री श्री श्री १००८ म.श्री महंत ज्ञानेश्वर...

Dnyaneshwar Bhartiji Maharaj : मठाधिश श्री श्री श्री १००८ म.श्री महंत ज्ञानेश्वर भारतीजी महाराज यांच्या स्वखर्चातून वृध्द आश्रमाची उभारणी -NNL

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| जगात असंख्य वयोवृद्ध दाम्पत् आहेत ज्यांना एकतर जन्मतःच (मुलबाळ) नसते. किंवा अपत्य असलेले अपत्य (मुलबाळ) अकाली मृत्युमुखी पडून वयोवृद्धावर निराधार होण्याची वेळ आलेली असते. शिवाय त्यांना जवळचे नातेवाईकही नसतात. यामुळे अशा आधाराकरीता, वृद्धांना सामाजिक जवळीकतेकरीता आणि त्यांच्या विरंगुळ्याकरीता वृद्धाश्रमाचा आधार असतो.

हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून माहूरगड येथील मठाधिश श्री श्री श्री १००८ म.श्री महंत ज्ञानेश्वर भारतीजी महाराज (श्री.ह.भ.प.आर्च बाळु महाराज काकाणी ) हे स्वखर्चातून वृध्द आश्रम उभारणार असून त्या वृध्द आश्रमाचे भुमिपूजन श्री श्री श्री १००८ श्री महंत उमाशंकर भारतीजी महाराज (अध्यक्ष श्री पंच दसणाम जुना आखाडा .काशी ) यांच्या शुभहस्ते व अनेक साधु संताच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

आज समाजात कित्तेक निराधार,बेघर,अनाथ वयोवृध्द आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतात.काहींना कुटुंब परिवार असतो तर काहींना नसतो.कित्तेक आज्जीआजोबांना घरी सांभाळलं जात नाही.घरातून हाकलून दिले जाते,कित्येकदा त्यांना कुठे तरी रस्त्याच्या,स्टेशन किंवा मंदिर परिसरात आणून सोडले जाते. अशा सर्व वयोवृध्द गरजू आजीआजोबांना खरंतर वृद्धापकाळात प्रेमाची,आधाराची,आपलेपणाने चौकशी करण्याची, काळजी घेण्याची गरज असते.

अशाच वयोवृद्धांना आधार देण्यासाठी येथील मठाधीश श्री श्री श्री १००८ म.श्री महंत ज्ञानेश्वर भारतीजी महाराज (श्री.ह.भ.प.आर्च बाळु महाराज काकाणी ) हे आपल्या स्वखर्चातून वृध्द आश्रम उभारणार आहे.सदरील वृध्द आश्रमाचे भूमिजन दि.१३ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वा श्री श्री १००८ श्री महंत उमाशंकर भारतीजी महाराज (अध्यक्ष श्री पंच दसणाम जुना आखाडा .काशी ) यांच्या शुभहस्ते व अनेक साधु-संताच्या व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत येथील पेट्रोल पंपासमोरील केशवे विद्यालयाच्या लगत असलेल्या मठाच्या परिसरात होणार असल्याची माहीती येथील शिष्य मंडळीनी दिली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments